Navneet Rana Dance : खासदार नवनीत राणांचा ‘ढोलिडा’ गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुमचेही पाय थिरकतील

नवनीत राणा या राजकीय व्यासपीठासह सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमातही सहभाग नोंदवतात. खासदार नवनीत राणा यांचा अजून एक डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तसंच राणा यांचा हा व्हिडीओ तरुणाईच्या चांगलाच पसंतीला उतरत आहे.

Navneet Rana Dance : खासदार नवनीत राणांचा 'ढोलिडा' गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुमचेही पाय थिरकतील
नवनीत राणा यांचा ढोलिडा गाण्यावर भन्नाट डान्स
Image Credit source: TV9
सुरेंद्रकुमार आकोडे

| Edited By: सागर जोशी

Apr 13, 2022 | 8:07 PM

अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्या आदिवासी लोकांसोबत जमिनीवरुन बसून जेवण करतात, कधी आपल्या कुटुंबासाठी स्वत: जेवण बनवतात. कधी त्या आदिवासी नृत्यावर ठेका धरतात, तर कधी एखाद्या खेळाच्या मैदानात पाहायला मिळतात. राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात (Mahavikas Aghadi) आंदोलनातही त्या अग्रभागी असतात. थोडक्यात नवनीत राणा या राजकीय व्यासपीठासह सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमातही सहभाग नोंदवतात. खासदार नवनीत राणा यांचा अजून एक डान्स व्हिडीओ (Dance Video) चांगलाच व्हायरल होत आहे. तसंच राणा यांचा हा व्हिडीओ तरुणाईच्या चांगलाच पसंतीला उतरत आहे.

अमरावतीमधील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीद्वारे सांस्कृतिक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देत नवनीत राणा या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. त्यावेळी विद्यार्थ्यांना नवनीत राणा यांच्याकडे नृत्याचा आग्रह धरला. सुरुवातीला नाही म्हणणाऱ्या राणा यांनी स्टेजवर जाऊन ढोलिडा गाण्यावर भन्नाट डान्स केला. यावेळी नवनीत राणांसह विद्यार्थीनीही ठेका धरताना दिसल्या.

नवनीत राणा यांचा भन्नाट डान्स

आदिवासी गाण्यावरही धरला होता ठेका

राणा दाम्पत्याने मेळघाटात होळीचा उत्साह साजरा केला होता. आदिवासी बांधवांसोबत राणा दाम्पत्याने होळी सण साजरा केला. इतक्या उत्साहाच्या वातावरणात शांत बसणार त्या नवनीत राणा कसल्या. कोणताही उत्साहाचा क्षण असला की नवनीत राणा त्यामध्ये सहभागी होत असतात. यापूर्वी अनेकदा त्यांनी नृत्यावर ठेका धरल्याचं आपण पाहिलं आहे. मेळघाटात होळीचा उत्साह असताना रवी राणा यांनी ढोलकी वाजवली तर नवनीत राणा यांनी आदिवासी गाण्यावर ठेका धरला. यावेळी राणा दाम्पत्याचा उत्साह पाहून उपस्थितांनीही त्यांचं कौतुक केलं.

इतर बातम्या :

Ganesh Naik Live In Case: आमदार गणेश नाईकांची अडचण, महिलेचा लिव्ह इनचा आरोप, मुलगा असल्याचाही दावा, महिला आयोगाचे चौकशीचे आदेश

Gunaratna Sadavarte : सदावर्तेंवर तिसऱ्यांदा वकिल बदलण्याची वेळ, न्यायलयीन कोठडीत रवानगी, कोर्टातला युक्तीवाद वाचलात?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें