खासदार नवनीत राणा भाजपच्या संपर्कात?

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यात राणा यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्याने या चर्चेला आणखी उधाण आले आहे.

खासदार नवनीत राणा भाजपच्या संपर्कात?
Follow us
| Updated on: Jun 25, 2019 | 11:06 AM

मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यात राणा यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्याने या चर्चेला आणखी उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने राणा यांना अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा दिला होता.

लोकसभेचा निकाल लागल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांनी भाजप प्रवेश करण्याची स्पर्धा लावली आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत होता. काँग्रेसचे तत्कालीन विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी तर थेट भाजपमध्ये प्रवेश करुन मंत्रीपदही मिळवले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत जाणे पसंत केले आहे. नवनीत राणा यांनीही पती रवी राणा यांच्यासह 21 जून रोजी शाह यांची घेतली. त्यामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.

नवनीत राणा यांनी मात्र, मतदारसंघातील विकासकामांसाठी शाह यांची भेट घेतल्याचे सांगितले. राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी ‘राजकारणात बदल होत राहतात’, असं सुचक वक्तव्य केलं होतं, त्यामुळे राणा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला अधिक जोर चढला आहे.

लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी अमरावतीतून शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला जवळजवळ 40,000 मतांनी हरवले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार होत्या. त्यावेळी अडसुळ यांनी राणांचा पराभव केला होता.

अवघ्या काही महिन्यांवर विधानसभा येऊन ठेपलेली असताना राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास काँग्रेस राष्ट्रवादीसाठी हा मोठा झटका असणार आहे. राणा यांचा अमरावतीमध्ये चांगला प्रभाव आहे. त्या जर भाजपमध्ये गेल्या तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीसाठी मोठे आव्हान उभे राहिल.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.