आंदोलनाची भाषा करणारे मराठा संघटनांचे नेते भाजपच्या चावीने चालतात: नवाब मलिक

| Updated on: Nov 29, 2020 | 8:02 PM

"मराठा संघटनांचे जे नेते आंदोलनाची भाषा करत आहेत ते भाजपच्या चावीने चालणारे नेते आहेत", असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. (Nawab Malik allegations on Maratha leaders)

आंदोलनाची भाषा करणारे मराठा संघटनांचे नेते भाजपच्या चावीने चालतात: नवाब मलिक
nawab malik
Follow us on

मुंबई : “मराठा संघटनांचे जे नेते आंदोलनाची भाषा करत आहेत ते भाजपच्या चावीने चालणारे नेते आहेत. भाजपमुळे हे नेते असं बोलत आहेत”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. चेंबूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात मलिक आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली (Nawab Malik allegations on Maratha leaders).

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा येत्या 8 डिसेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहे. दरम्यान, याबाबत नवाब मलिक यांना प्रश्न विचारला असता, “मराठा आरक्षण न्यायप्रविष्ठ असल्याने मोदी सरकारने कायदा करुन मराठा आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

मराठा क्रांती मोर्चाची आज (29 नोव्हेंबर) पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राज्यभरातील मराठा समन्वयक उपस्थित होते. या बैठकीत सरकार मराठा आरक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी 8 डिसेंबर रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला (Nawab Malik allegations on Maratha leaders).

दरम्यान, भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांनी आज साताऱ्यात मराठा समाजातील तरुणांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी जाहीर पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारच्या सरकारच्या काळात करुन दाखवलं होतं, पण आज त्यांना नावं ठेवली जातात. आज तुम्ही सत्तेत आहात तर करुन दाखवा, असे थेट आव्हान उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला दिले.

उदयनराजे यांच्या टीकेचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी समर्थन केले. “देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता द्या. मराठा आरक्षणाची जबाबदारी मी घेतो, असे सांगून खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाच्या मनातील भावना बोलून दाखविली आहे”, असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळाले. त्यामुळेच मराठा समाजाच्या मनात ही भावना असल्याचे दरेकर म्हणाले.

हेही वाचा :

‘देवेंद्र फडणवीसांच्या हातात सत्ता द्या’; उदयनराजेंनी मराठा समाजाच्या मनातील भावना बोलून दाखवली: दरेकर

फडणवीसांनी करुन दाखवलं, पण त्याला नावं ठेवली, सत्तेत आहात तर करुन दाखवा, उदयनराजे आक्रमक

‘मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो’, उदयनराजेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल