समीर वानखेडेकडून प्रायव्हेट आर्मी चालवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, नवाब मलिकांचा आरोप

| Updated on: Oct 30, 2021 | 8:11 PM

शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी न घेता समीर वानखेडे याने प्रायव्हेट आर्मी तयार करुन दहशत निर्माण केली होती. हे भविष्यात सिध्द करणार असल्याचं नवाब मलिकांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. दरम्यान, क्रुझवर ड्रग्जची रेव्ह पार्टी झाली आणि त्या पार्टीमध्ये एका रेस्टॉरंटमधून जे जेवण गेलं त्यातूनच ड्रग्ज गेलं होतं ते सगळे पुरावे समोर आणणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले.

समीर वानखेडेकडून प्रायव्हेट आर्मी चालवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, नवाब मलिकांचा आरोप
समीर वानखेडे नवाब मलिक
Follow us on

मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आरोपांची मालिका सुरुच ठेवलीय. शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी न घेता समीर वानखेडे याने प्रायव्हेट आर्मी तयार करुन दहशत निर्माण केली होती. हे भविष्यात सिध्द करणार असल्याचं नवाब मलिकांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. दरम्यान, क्रुझवर ड्रग्जची रेव्ह पार्टी झाली आणि त्या पार्टीमध्ये एका रेस्टॉरंटमधून जे जेवण गेलं त्यातूनच ड्रग्ज गेलं होतं ते सगळे पुरावे समोर आणणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले. (Nawab Malik criticizes NCB official Sameer Wankhede over Private Army )

एनसीबीच्या डीजींकडे माझ्याकडे असलेले रितसर पुरावे पाठवणार आहे. इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल त्यांच्या कार्यालयातील आहेत. जागेवर जाऊन मुद्देमाल जप्त केला जात नाही. कार्यालयात आणून हे सर्व केलं जातंय. एका कोर्‍या कागदावर सह्या घेतल्या जात आहेत. समीर वानखेडे याने एक प्रायव्हेट आर्मी तयार केली असून त्यामध्ये प्लेचर पटेल, आदिल उस्मानी, के. पी. गोसावी, मनीष भानुशाली यासारखे अनेक लोक आहेत. हे सर्व घरात घुसून ड्रग्ज ठेवत आहेत आणि लोकांना अडकवत आहेत हे सगळं फर्जीवाडा असून याची संपूर्ण माहिती काढली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

कालच फर्निचरवाला नावाच्या मुलीने तिच्या बहिणीला कसं अडकवलं त्यावेळी प्लेचर पटेल उपस्थित होता हे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा आणखी मोठा उलगडा होईल असेही नवाब मलिक म्हणाले.

आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही- मलिक

नवाब मलिक गोंदियाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मीडियाने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. या देशात कायद्याने माझ्या परिवाराला व्यापार करण्याचा अधिकार आहे. माझ्याकडे आहे ते सर्व कागदोपत्री आहे. ज्यांच्या बेनामी संपत्ती आहेत. सोशल मीडियावर लाल गाठोड दाखवत आहेत असे चोर लोकच माझ्याकडे बोट दाखवत आहेत, अशी जहरी टीका मलिक यांनी केली.

भंगारवाला आहे, चोर नाही

मी भंगारवाला आहे… पण चोर नाही अशा रद्दी माझ्याकडे दहा – वीस आणि शंभर टन आहेत. आम्ही चोर नाही… आम्ही डाकूकडून सोनं घेतलं नाही… बँका बुडवल्या नाहीत… त्या वानखेडेशी कुणाचा काय संबंध आहे… कुठल्या हॉटेलचे कोण मालक आहेत… त्या हॉटेलमधील वस्तू क्रुझवर कशा गेल्या… क्रुझवरील कॅटरिंगॉमध्ये ड्रग्ज कसे गेले… आता मी नावं घ्यायला सुरुवात केलेली आहे… इतकं का घाबरताय? असा सवालही त्यांनी केला.

इतर बातम्या :

आर. आर. पाटलांच्या पावलावर पाऊल! नक्षलवाद्यांच्या धमक्या झुगारून एकनाथ शिंदे गडचिरोलीत, पोलिस जवानांसोबत दिवाळी साजरी

मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएमकडून तिरंगा रॅलीची घोषणा, तर वंचितसोबत आघाडीचे ओवेसींचे संकेत!

Nawab Malik criticizes NCB official Sameer Wankhede over Private Army