आर. आर. पाटलांच्या पावलावर पाऊल! नक्षलवाद्यांच्या धमक्या झुगारून एकनाथ शिंदे गडचिरोलीत, पोलिस जवानांसोबत दिवाळी साजरी

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील दोदराज पोलिस स्टेशनला भेट दिली. इतकंच नाही तर तिथल्या पोलिस जवानांच्या सोबत दिवाळीचा सणही शिंदे यांनी साजरा केला.

आर. आर. पाटलांच्या पावलावर पाऊल! नक्षलवाद्यांच्या धमक्या झुगारून एकनाथ शिंदे गडचिरोलीत, पोलिस जवानांसोबत दिवाळी साजरी
एकनाथ शिंदेंची गडचिरोलीतील पोलिसांसोबत दिवाळी साजरी


भामरागड : आघाडी सरकारच्या काळात नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारण्यास कुणी तयार नव्हतं असं बोललं जातं. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मागून घेतलं होतं. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत, नक्षलवाद्यांच्या धमकीला भीक न घालता गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील दोदराज पोलिस स्टेशनला भेट दिली. इतकंच नाही तर तिथल्या पोलिस जवानांच्या सोबत दिवाळीचा सणही शिंदे यांनी साजरा केला. (Eknath Shinde celebrates Diwali with police on Gadchiroli tour despite Naxal threats)

अशा धमक्या खूप येतात. त्या धमक्यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. धमक्यांबाबत ठाणे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ते तपास करत आहेत. धमक्यांचा परिणाम यापूर्वीही झाला नाही आणि आताही होणार नाही. गडचिरोलीच्या विकासाचं माझं काम सुरुच राहील, असं आश्वासक मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गडचिरोली दौऱ्यात व्यक्त केलं आहे.

पोलिस जवानांना दिवाळी फराळाचे वाटप

नक्षली कारवायांमुळे अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भगात सणवार सोडून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस जवानांना यावेळी दिवाळीच्या खास शुभेच्छा देऊन फराळाचे वाटप केले. यावेळी गडचिरोलीचे पोलिस उपमहानिरीक्षक संदिप पाटिल, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलिस अधीक्षक अंकित गोयल हेदेखील उपस्थित होते. तसेच, सिरोंचा तालुक्यातील जिमाका येथील जंगलात ओरीसा आणि छत्तीसगड येथून आलेल्या जंगली हत्तींना संरक्षण मिळवून देण्यासाठी आढावा बैठक घेऊन चपराळा येथील अभयारण्याची पाहणीही शिंदे यांनी केली.

जंगली हत्तींसाठी अभयारण्याचा विचार

गडचिरोली जिल्हयात गेल्या महिनाभरापासून जंगली हत्तींचे वास्तव्य वाढले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, तसेच हत्तींना आवश्यक वातावरण असलेली जागा तयार करण्याच्या अनुषंगाने चपराळा येथील अभयारण्याचा विचार होऊ शकतो का, याबाबत वन विभाग व प्रशासनाकडून पडताळणी करण्यात आली. हत्तींच्या नैसर्गिक निवासाबाबत व जागा तयार करायची असल्यास त्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतील, याबाबत मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर यांनी सादरीकरण केलं. यावेळी पोलिस उपमहानिरीक्षक संदिप पाटिल, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, उपवनसंरक्षक कुमारस्वामी हे उपस्थित होते.

इतर बातम्या :

मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएमकडून तिरंगा रॅलीची घोषणा, तर वंचितसोबत आघाडीचे ओवेसींचे संकेत!

राष्ट्रवादीनं ‘त्या’ 22 नगरसेवकांची यादी जाहीर करावी, भाजपचं आव्हान; कलानींचं स्पष्टीकरण काय?

Eknath Shinde celebrates Diwali with police on Gadchiroli tour despite Naxal threats

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI