‘पेडलरची बायको म्हणून हिणवलं, मुलांनी मित्र गमावले’, नवाब मलिकांची मुलगी निलोफरचे खुले पत्र

| Updated on: Nov 06, 2021 | 8:09 PM

शनिवारी 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.15 च्या सुमारास निलोफरने एक ट्विट केले. ट्विटरवर निलोफर खानने या खुल्या पत्राला 'फ्रॉम द वाइफ ऑफ एन इनोसेंट, द बिगनिंग' असे नाव दिले. निलोफरने लिहिले, “आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा अचानक तुमच्यावर संकट येते. तुम्हाला सावरण्याची संधीही मिळत नाही.

पेडलरची बायको म्हणून हिणवलं, मुलांनी मित्र गमावले, नवाब मलिकांची मुलगी निलोफरचे खुले पत्र
Follow us on

नवी दिल्लीः Nawab Malik daughter Nilofer नवाब मलिक यांची कन्या निलोफरनं एक पत्र लिहिलंय, त्या पत्रानं आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. निलोफरने या पत्राला ‘फ्रॉम द वाइफ ऑफ एन इनोसेंट, द बिगनिंग’ असे शीर्षक दिलेय. त्यात निलोफर मलिक खानने तिचा पती समीर खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने अटक केलेल्या रात्रीची आठवण सांगितलीय आणि तिचे कुटुंब अजूनही ज्या ‘संकटा’शी झुंजत आहे, त्याबद्दल माहिती दिलीय.

मुलगी निलोफर मलिक खान हिचं खुलं पत्र

महाराष्ट्र सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक खान हिने एक खुले पत्र लिहिले. त्यात तिने तिचा पती समीर खान याला एनसीबीने जानेवारीमध्ये अटक केल्यानंतर तिच्या कुटुंबाला दिलेल्या वागणुकीची आठवण करून दिलीय आणि ती “अन्याय आणि बेकायदेशीर” असल्याचे म्हटले आहे.

निलोफरनं नेमकं पत्रात काय लिहिलं?

निलोफरच्या पतीचे नाव समीर खान आहे. 13 जानेवारी रोजी एनसीबीने 194.6 किलो गांजा खरेदी आणि विक्री केल्याप्रकरणी समीर खानला अटक केली होती. या प्रकरणी समीन खान आणि अन्य 5 जणांना आरोपी करण्यात आले.

फ्रॉम द वाइफ ऑफ एन इनोसेंट, द बिगनिंग

शनिवारी 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.15 च्या सुमारास निलोफरने एक ट्विट केले. ट्विटरवर निलोफर खानने या खुल्या पत्राला ‘फ्रॉम द वाइफ ऑफ एन इनोसेंट, द बिगनिंग’ असे नाव दिले. निलोफरने लिहिले, “आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा अचानक तुमच्यावर संकट येते. तुम्हाला सावरण्याची संधीही मिळत नाही. तुम्ही स्वतःला बिघडलेल्या परिस्थितीने वेढलेले आहात. आमच्या कुटुंबावरही अशीच एक आपत्ती ओढवली. मला अजूनही आठवते ती 12 जानेवारीची रात्री. जेव्हा माझ्या पतीला त्याच्या आईने फोन केला आणि सांगितले की, दुसऱ्या दिवशी त्याला एनसीबीने कार्यालयात बोलावले होते. समीर जेव्हा एनसीबी कार्यालयात पोहोचला, तेव्हा त्याला दिसले की बरीच माध्यमे त्याच्या येण्याची वाट पाहत आहेत.

ते 15 तास माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी खूप त्रासदायक

“माझे पती सकाळी 9 वाजता एनसीबी कार्यालयात पोहोचले आणि रात्री 12 वाजेपर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली. ते 15 तास माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी खूप त्रासदायक होते. मी रागाच्या भरात खिडकीच्या काचेवर हात मारला, काच फुटून माझ्या पायावर पडली आणि माझ्या पायाला टाके पडले. 12 वाजता मला समीरचा फोन आला की त्याला अटक मेमोवर सही करण्यास सांगितले आणि त्यांना अटक करण्यात येत आहे.

पुराव्याअभावी माझ्या पतीला अनेक महिने तुरुंगात ठेवण्यात आले

कोणतेही ठोस पुरावे नसतानाही समीरला अटक करण्यात आली. यामुळे आम्हाला खूप त्रास झाला. मग आम्हाला समजले की, ती कारवाई समीरपेक्षा त्याच्यावर वैयक्तिकरित्या जास्त केली जात आहे. त्या रात्री माझ्या पालकांनी मला त्यांच्या घरी राहण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी मला सुरक्षारक्षकाचा फोन आला की, NCB टीम आली आहे. घर आणि ऑफिसची झडती घ्यायची आहे. सकाळचे साडेसात वाजले होते. मी तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांनी शोधाशोध सुरू केली होती. पण त्यांना आमच्या घरात आणि ऑफिसमध्ये काहीही मिळालं नाही. पुराव्याअभावी माझ्या पतीला अनेक महिने तुरुंगात ठेवण्यात आले. आमच्या कुटुंबाला ‘बहिष्कृत’ करण्यात आल्याचा आरोप निलोफरने केला. आमच्यासाठी “पेडलरची बायको” आणि “ड्रग स्मगलर” असे शब्द वापरले गेले. आमच्या मुलांनी मित्र गमावलेत. जवळपास आठ महिन्यांच्या तुरुंगवासानंतर न्यायालयाने समीर खानला जामीन मंजूर केला.

संबंधित बातम्या

समीर वानखेडेंनी आर्यन खानचं अपहरण केलं, नवाब मलिक यांच्या गंभीर आरोपाने खळबळ

Aryan Khan drugs case | समीर वानखेडेंच्या ‘त्या’ 5 चुका, ज्यामुळे त्यांना आर्यन खान प्रकरणातून हटवलं; वाचा सविस्तर