समीर वानखेडेंनी आर्यन खानचं अपहरण केलं, नवाब मलिक यांच्या गंभीर आरोपाने खळबळ

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आज सकाळी सकाळीच गंभीर आरोप केला. समीर वानखेडेंनी आर्यन खानचं अपहरण केलं आहे. (Let's see who will expose Wankhede’s nefarious army: Nawab Malik)

समीर वानखेडेंनी आर्यन खानचं अपहरण केलं, नवाब मलिक यांच्या गंभीर आरोपाने खळबळ
नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 11:00 AM

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आज सकाळी सकाळीच गंभीर आरोप केला. समीर वानखेडेंनी आर्यन खानचं अपहरण केलं आहे, असा आरोपच नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नवाब मलिक यांनी आज सकाळी सकाळीच एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी हा गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. आर्यन खान प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मी मागणी केली होती. त्यानंतर एक नव्हे तर दोन एसआयटी स्थापन करण्यात आल्या आहेत. एक राज्य सरकारने आणि दुसरी केंद्र सरकारने स्थापन केली आहे. आता कोण वानखेडेंचा आणि त्यांच्या खासगी आर्मीचा पर्दाफाश करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, असं मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मात्र, मलिक यांनी पहिल्यांदाच वानखेडेंवर आर्यन खानच्या अपहरणाचा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सहा प्रकरणाचा सहा अधिकारी तपास करणार

दरम्यान, आर्यन खान प्रकरणासह एकूण सहा प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंकडून काढून घेण्यात आला आहे. दिल्लीहून आज सहा अधिकारी येणार असून प्रत्येक अधिकारी वेगवेगळ्या प्रकरणाचा तपास करणार आहे. दिल्लीतील एनसीबीचे अधिकारी संजय कुमार सिंग हे सुद्धा आज मुंबईत येणार आहेत. संजय सिंग हे आर्यन खान प्रकरणाचा तपास करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, वानखेडे यांच्याकडून मलिक यांचे जावई समीर खान यांची केसही काढून घेतली नाही.

माझी बदली नाही

काल संध्याकाळी वानखेडे यांची बदली झाल्याची जोरदार चर्चा होती. वानखेडे यांची मुंबईतून दिल्लीत बदली करण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, वानखेडे यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. मी मुंबई एनसीबीतच आहे. माझी दिल्लीत बदली करण्यात आलेली नाही, असं सांगतानाच मला तपास कामातून वगळण्यात आलेलं नाही, असं वानखेडे यांनी स्पष्ट केलं आहे.

कंबोज काय गौप्यस्फोट करणार

दरम्यान, भाजप नेते मोहित कंबोज आज नवाब मलिक यांची पोलखोल करणार आहेत. त्यापूर्वीच त्यांनी मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांच्याकडे 3 हजार कोटींची बेनामी संपत्ती आहे. त्यांच्याकडे एकूण 22 संपत्ती आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब फॅमिली ट्रस्टच्या नावाने जोडले गेले आहेत. भंगारवाला करोडपती कसा झाला हे राज्यातील जनतेला कळायला हवं, असं कंबोज यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

Video : सभा गाजवणारे मंत्री गुलाबराव पाटील जेव्हा कव्वाली गातात…!

सोनिया गांधींनी काँग्रेसशासित राज्यांना पेट्रोल-डिझलचे दर कमी करायला सांगावेत: भाजप

Maharashtra News LIVE Update | पोटनिवडणुकीत दणका, भाजपने राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलावली

(Let’s see who will expose Wankhede’s nefarious army: Nawab Malik)

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.