Pagasusच्या माध्यमातून पाळत ठेवून फोन हॅक करण्याची बाब गंभीर, चौकशी करा- नवाब मलिक

| Updated on: Jul 19, 2021 | 7:22 PM

हेरगिरी प्रकरणाची चौकशी करून जो जबाबदार असेल त्याच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

Pagasusच्या माध्यमातून पाळत ठेवून फोन हॅक करण्याची बाब गंभीर, चौकशी करा- नवाब मलिक
नवाब मलिक, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

मुंबई : भारतातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मंत्री, न्यायाधीश आणि उद्योगपती यांच्यावर पेगॅससच्या माध्यमातून पाळत ठेवून फोन हॅक करण्यात आल्याची बाब गंभीर आहे. याप्रकरणाची चौकशी करून जो जबाबदार असेल त्याच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. 300 भारतीयांची केंद्र सरकारनेच जासूसी केल्याचा आरोप होतोय. यात 40 पेक्षा जास्त पत्रकार आहेत तर जजेस, उद्योगपती यांचीही हेरगिरी केल्याचं वृत्त एका न्यूज पोर्टलनं दिलेलं आहे. याच मुद्यावर आज संसदेत गदारोळ झाला. (Nawab Malik has demanded an inquiry into the spying through Pegasus)

इस्त्रायलमधील सॉफ्टवेअर एजन्सीने आमचं सॉफ्टवेअर फक्त सरकारलाच विकत असल्याचे स्पष्ट केले आहे. खाजगी लोकांना नाही. जर खाजगी लोकांना विकण्यात आले नाही तर केंद्रसरकारच्या कुठल्या एजन्सीने देशातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मंत्री, न्यायाधीश, उद्योगपती यांचे फोन हॅक करुन पाळत ठेवली? असा सवाल नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून केलाय. केंद्रसरकारच्या माहितीसाठी हे करण्यात आले असेल तर कुठल्या अधिकार्‍याने किंवा एजन्सीने फोन हॅक करुन पाळत ठेवली याचे उत्तर मोदी सरकारने जनतेला दिले पाहिजे असेही नवाब मलिक म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधींचा आरोप

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी Pegasus सॉफ्टवेअर हॅकिंग प्रकरणावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. तुमच्या फोनमधील ते काय वाचत आहेत आम्हाला माहीत आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी Pegasus सॉफ्टवेअरद्वारे भारतातील पत्रकार आणि नेत्यांसह इतरांचे फोन टॅप करण्यात आल्याचा दावा आंतरराष्ट्रीय मीडियाने केला आहे. इस्रायलची एक कंपनी एनएसओ ग्रुपने हॅकिंग सॉफ्टवेअर Pegasusचा वापर करून अनेकांचे फोन टॅप केल्याचं उघड झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार लीगल कम्युनिटीशी संबधित लोक, उद्योजक, सरकारी अधिकारी, वैज्ञानिक, कार्यकर्ते आणि इतरांचे नंबर या लिस्टमध्ये आहेत. या लिस्टमध्ये 300 हून अधिक भारतीयांचे मोबाईल नंबर असल्याचा दावा केला जात आहे.

पेगासस काम कसं करतं?

ज्याच्या फोनला हॅक करायचं असतं त्याच्यात पेगासस इन्स्टॉल करण्यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. त्यातला एक मार्ग असाही आहे की, ज्या फोन यूजर्सला टार्गेट करायचं आहे त्याच्या फोनवर एक एक्स्प्लॉईट लिंक पाठवली जाते. जसही त्या लिंकवर यूजर क्लिक करतो, पेगासस आपोआप इन्स्टॉल होतं.

देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

विरोधी पक्षातील राजकीय व्यक्तींना पशु-पक्ष्यांची नावे देणे ही भाजपचीच संस्कृती आहे अशा शब्दात नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना पक्ष्यांची उपमा दिली असून भाजपच्या या कृतीला नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विरोधी पक्षांच्या लोकांना साप, विंचू, तर कधी कुत्रा बोलत आहेत तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षांच्या नेत्यांना पक्ष्यांची उपमा देत आहेत, यावरुन त्यांची सवय आणि संस्कृती समोर येत असल्याचा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

संबंधित बातम्या :

विरोधी पक्षाच्या नेत्यांना पशू-पक्ष्यांची नाव देणं ही भाजपचीच संस्कृती; नवाब मलिक यांची खोचक टीका

Parliament Monsoon Session: राहुल गांधींच्या हेरगिरीच्या वृत्ताने काँग्रेस भडकली; केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हकालपट्टीची केली मागणी

ज्या पेगाससवर संसदेत रान उठलंय, ते नेमकं आहे काय, नेमकी हेरगिरी कशी केली जाते? वाचा सविस्तर

Nawab Malik has demanded an inquiry into the spying through Pegasus