राष्ट्रवादीला धक्का, 17 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशातील राजकारणात अनेक भूकंप होत असल्याचे दिसत आहे. अनेक पक्षातील आमदार, खासदार, नगरसेवक भाजपात प्रवेश करत आहेत. मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण करण्यात येत आहे. यामध्ये आता राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे जवळपास 17 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा फोडाफोडीच्या …

राष्ट्रवादीला धक्का, 17 आमदार  मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशातील राजकारणात अनेक भूकंप होत असल्याचे दिसत आहे. अनेक पक्षातील आमदार, खासदार, नगरसेवक भाजपात प्रवेश करत आहेत. मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण करण्यात येत आहे. यामध्ये आता राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे जवळपास 17 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे.

दरम्यान, बाहेरील आमदारांना पक्षात प्रवेश दिला आणि त्यांना उमेदवारी दिली, तर पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय होईल. यामुळे कार्यकर्त्यांच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल, असं भाजपच्या वरीष्ठ नेत्यांना वाटत असल्याने थोडा वेळ थांबण्याचा सल्ला देण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.

नुकतेच काँग्रेसचे वरीष्ठ नेते आणि विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटीलही काँग्रेसला रामराम करत भाजपात जाण्याचा तयारीत आहेत. तर राष्ट्रवादीचे कोल्हापुरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा दारुण पराभव झाल्यानंतर तेही आता भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसलेला आहे. काँग्रेसचे नेते विखे पाटील, चार आमदार,अनेक जिल्हा परिषद सदस्य तसेच अनेक नेते भाजपच्या वाटेवर असून 1 जूनला भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे. 50 नगरसेवक आणि 2 आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. तसेच अजून काही आमदार आणि नेते मंडळी लवकरच भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली आहे. फोडाफोडीच्या राजकारणांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला येत्या विधानसभेतही नक्कीच फटका बसेल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

विधानसभा (2014) निकाल 

  • भाजप : 128
  • शिवसेना : 66
  • काँग्रेस : 42
  • राष्ट्रवादी : 41
  • इतर : 11
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *