AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हर्षवर्धन पाटील भाजपचे बारामती लोकसभेचे संभाव्य उमेदवार? आतापासूनच पाटलांचे पंख छाटण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न, इंदापूरमध्ये काय घडतंय?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे उद्या (दिनांक 3 एप्रिल) इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी या ठिकाणी पक्ष प्रवेशासाठी येत आहेत, यासाठी तब्बल साडेतीन ते चार तास त्यांचा बहुमूल्य वेळ देणार आहेत.

हर्षवर्धन पाटील भाजपचे बारामती लोकसभेचे संभाव्य उमेदवार? आतापासूनच पाटलांचे पंख छाटण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न, इंदापूरमध्ये काय घडतंय?
हर्षवर्धन पाटील शरद पवार सुप्रिया सुळे
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Apr 02, 2022 | 5:30 PM
Share

पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे उद्या (दिनांक 3 एप्रिल) इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी या ठिकाणी पक्ष प्रवेशासाठी येत आहेत, यासाठी तब्बल साडेतीन ते चार तास त्यांचा बहुमूल्य वेळ देणार आहेत. तसे पाहता शरद पवार हे कधीच इंदापूर येथे एखाद्या पक्ष प्रवेशाला आले असल्याचे किंवा एवढा वेळ दिला असल्याचे पहावयास मिळत नसल्याचे बोलले जात आहे, मात्र एखाद्या माजी जिल्हा परिषद सदस्य च्या पक्ष प्रवेशासाठी चक्क शरद पवार हे उपस्थित रहात असून त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे, मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व पुणे जिल्ह्यातील आजी-माजी आमदार या पक्ष प्रवेशासाठी उपस्थित राहणार आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले सर यांच्यासोबत इतरही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचे प्रवेश होणार आहेत, श्रीमंत ढोले सर व प्रवेश करणारे इतर पदाधिकारी हे हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत.. त्यामुळे हर्षवर्धन पाटील (Harshawardhan Patil) यांचे पंख छाटण्याच काम राष्ट्रवादी करीत असल्याचे चित्र आहे.

2024 ला बारामती लोकसभेचे हर्षवर्धन पाटील भाजपचे संभाव्य उमेदवार

गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादीच्या गोटात बारामती लोकसभा मतदार संघात भाजप कडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे संभाव्य उमेदवार असल्याची कुणकुण होती.बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर तालुका येत असल्याने व इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांची पकड अजूनही कायम असल्याने भविष्यात हर्षवर्धन पाटील हे पवारांना कडवे आव्हान देऊ शकतात असं चित्र समोर येत होते. मागील लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी त्यांच्याच मतदारसंघात कडवे आव्हान उभे केले होते, निवडणुकीत रंगत आणली होती.

राष्ट्रवादीला आव्हानात्मक वाटणारी निवडणूक मात्र नंतर राष्ट्रवादीने एक तर्फे जिंकल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले होते, परंतु त्यावेळी इंदापूर तालुक्यातून चांगले मताधिक्य सुप्रिया सुळे यांना मिळाले होते, हे मताधिक्‍य मिळण्यात राष्ट्रवादीचे राज्यमंत्री व तत्कालीन आमदार दत्तात्रय भरणे यांचा जसा वाटा होता, तसाच वाटा काँग्रेसचे तत्कालीन नेते राहिलेले व आता भाजपमध्ये असणारे हर्षवर्धन पाटील यांचा देखील मोठा हातभार होता, विधानसभेच्या निवणुकीच्या तोंडावरती हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडत भाजप मध्ये प्रवेश केला, त्यांनी भाजपतर्फे विधानसभा निवडणूक लढवली आणि ते या निवणुकीत अपयशी ठरले. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी पवारांनाच आव्हान उभे केले आहे, बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचा विधानसभा मतदार संघ म्हणून ओळख असणारा इंदापूर तालुक्यात भाजपला हर्षवर्धन पाटील यांच्या रूपाने तगडा नेता मिळाला आहे. हर्षवर्धन पाटील जर भविष्यात खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हान देणार असतील तर हर्षवर्धन पाटील यांच्या जवळचे मोहरे आपल्या गळाला लावण्याचे राजकारण उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणारे शरद पवार यांनी सुरू केल्याचं बोलले जात आहे तसेच चित्र ही सध्या इंदापूर करांना पाहावयास मिळत आहे.

पक्ष प्रवेशासाठी शरद पवार चार तास इंदापूर मध्ये

एवढा कधीच वेळ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी इंदापूर तालुक्यात एखाद्या पक्षप्रवेशासाठी दिला नसल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.भविष्यात हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादीची डोकेदुखी ठरू शकतात, त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या जवळच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांचे प्रवेश घडवून आणण्याचे नियोजन खुद्द शरद पवार यांनी केले जात असल्याचे बोलले जात आहे, हर्षवर्धन पाटील यांचे अनेक महत्त्वाचे सहकारी त्यांना सोडून जात आहेत यातूनच भाजपचे आणि हर्षवर्धन पाटील यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून केले जात आहेत… या पक्ष प्रवेशासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे लाखेवाडी जवळपास साडेतीन ते चार तास आपला बहुमूल्य वेळ देणार आहेत..

भाजप पक्ष हर्षवर्धन पाटलांना कशाप्रकारे बळ देणार…?

राष्ट्रवादीने हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक फोडल्याने हर्षवर्धन पाटील एकाकी पडल्याचे चित्र आहे, असे असले तरी हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये पाटलां विषयी सहानुभूतीची लाट पसरलेली सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून येत आहे. तर, दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांची होत असणारी ही गळचेपी आख्खा महाराष्ट्र पहात आहे, त्यामुळे भाजप पक्ष बारामतीच्या पवारांना शह देण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांना कशा पद्धतीने बळ देणार? त्यांचे पुनर्वसन कशा पद्धतीने करणार याकडे तमाम इंदापूर तालुक्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

इतर बातम्या :

‘शरद पवारांनी देशाचं पंतप्रधान व्हावं’, महाविकास आघाडी नव्हे तर भाजप जवळच्या नेत्यांचं वक्तव्य!

CM Uddhav Thackeray on Cyber Crime: सायबर क्राईमचा व्हायरस रोखण्यासाठी यंत्रणा उभारणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Follow Us
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर