उद्धव ठाकरे-मुनगंटीवारांच्या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Feb 03, 2021 | 3:33 PM

भाजपला शिवसेनेशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. | Jayant patil

उद्धव ठाकरे-मुनगंटीवारांच्या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
भाजपला निराशेने ग्रासले आहे. शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय त्यांना दिसत नाही.
Follow us on

वर्धा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Manguntiwar) यांच्यातील बहुचर्चित भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अखेर भाष्य करण्यात आले आहे. भाजपला शिवसेनेशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळेच भविष्यात कधीतरी शिवसेना पुन्हा आपल्यासोबत येईल, अशी आशा भाजपच्या मनात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. (BJP don’t have any option apart from Shivsena says NCP Jayanat Patil)

ते बुधवारी वर्ध्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप जाणुनबुजून स्वत:च्या सोयीची वातावरणनिर्मिती करून पाहत असल्याचा आरोप केला. भाजपला निराशेने ग्रासले आहे. शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय त्यांना दिसत नाही. त्यामुळे स्वत:च्या मतदारसंघाच्या कामाचे कारण पुढे करून भाजपचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. या भेटीतून वेगळे अर्थ काढून चर्चा घडवून आणायची आणि त्या माध्यमातून होणाऱ्या राजकीय वातावरणनिर्मितीचा फायदा उठवायचा, हा भाजपचा डाव असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

‘ईव्हीएम मशिनऐवजी मतपत्रिका वापरणे रास्त’

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मतपत्रिकांच्या आधारे मतदान घेण्यासाठी केलेल्या सूचनेचे जयंत पाटील यांनी समर्थन केले. अलीकडच्या काळात आलेले अनुभव पाहता नाना पटोले यांनी हे वक्तव्य केले असावे. मतमोजणीसंदर्भात लोकांच्या मनात शंका आहेत. त्या खोडून काढायच्या असतील तर मतपत्रिकेवर निवडणूक घेणे रास्त आहे. त्यामुळे राज्य सरकारने या मागणीवर विचार करावा, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

काय म्हणाले होते सुधीर मुनगंटीवार?

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Manguntiwar) यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी सूचक वक्तव्य केले होते. शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू असणार नाही. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत, ते सोनिया गांधींच्या दबावाखाली येणार नाहीत, असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत. कधीकाळी युतीमध्ये सडलो, म्हणत युती तोडली, पण नंतर परत सोबत आले, आता पुढे बघू, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

शिवसेना अंतिम श्वासापर्यंत शत्रू नाही, पुढे बघू काय होतंय; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मुनगंटीवारांचे वक्तव्य

भाजपने आधीच सुधीर मुनगंटीवारांकडे सर्व जबाबदारी दिली असती तर…? उदय सामंतांचं मोठं विधान

मुनगंटीवार स्वत:साठी शिवसेनेकडे फिल्डींग लावतायत? फडणवीसांची भूमिका काय?

(BJP don’t have any option apart from Shivsena says NCP Jayanat Patil)