Rohit Pawar: भीमनवार मुख्यमंत्र्यांचे कॉलेजचे जीवलग मित्र? रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

Rohit Pawar: नुकसात आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील आंदोलन स्थळाहून पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

Rohit Pawar: भीमनवार मुख्यमंत्र्यांचे कॉलेजचे जीवलग मित्र? रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
Rohit Pawar And CM
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 11, 2026 | 12:18 PM

पुण्यातील एस.एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनाचा आज अकरावा दिवस आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. आज रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना भीमनवार जे आहेत एमपीएससीचे अध्यक्ष ते जे मुख्यमंत्री साहेबांचे जीवलग मित्र आहेत असे म्हटले आहे. ते विद्यार्थ्यांऐवजी मित्राची जास्त काळजी घेत आहेत असा आरोप केला आहे.

माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, मला नक्षल बोलण्यात आले. पैसे घेऊन बिकावू लोकं आहेत हे विद्यार्थी असे सांगण्यात आले. त्याचबरोबर इथे तमाशाचा फड सुरु आहे. म्हणजे इथे जे विद्यार्थी येतात ते स्वत:च्या हक्कासाठी येत नाहीत. पण फक्त मनोरंजनाच्या कामासाठी आणि टाइमपास करण्यासाठी येतात. याचा अर्थ हे सत्ताधारी लोक आहेत त्यांचं एवढं म्हणणं आहे जे गरीब लोक आहेत त्यांना दुसरं काहीच काम नाहीत. त्यांच फक्त काय तर मनोरंजनाच्या कार्यक्रमाला जातात आणि स्वत:च्या हक्कासाठी ते लढत नाही. मग कुठे ना कुठे सत्ताधारी लोक गरीबाची थट्टा करतायेत, मज्जा करतायेत, शेतकऱ्यांच्या पोरांची मज्जा करतायेत, मुला मुलींची मज्जा करतायेत. त्याच्याच बरोबर जे आमचे शेत मजूर आहेत त्यांची मुलं आणि मुली इथे स्पर्धापरिक्षेसाठी येतात, आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतायेत त्यांची देखील थट्टा हे लोक करत असतील कदाचित हे सर्व सत्ताधारी आमदार आणि नेत्यांना श्रीमंत, पैसेवाले, कॉन्ट्रॅक्टर यांचच पडलं आहे. बाकी इतर कोणाचंही पडलेलं नाही. मला या सर्व सत्ताधारी लोकांना सांगायचं आहे की आतापर्यंत एमपीएससीचेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर येत होते. आता हळूहळू नागरिक सुद्धा या विद्यार्थांना मोठ्या प्रमाणावर पाठींब देण्यासाठी येत आहेत.

Loading...

पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्री साहेबांना टार्गेट करावं लागेल ना? भीमनवार जे आहेत एमपीएससीचे अध्यक्ष ते जे मुख्यमंत्री साहेबांचे जीवलग मित्र असतील, कॉलेजमध्ये त्यांनी एकत्रीत अभ्यास केला असेल. त्याच्याच बरोबर आयएस अधिकारी कोणी बनवलं? तर मुख्यमंत्र्यांनी बनवलं आहे. त्याचबरोबर 6 वर्षे आरटीओ कमिशनर त्यांना कोणी केले असेल? तर ते मुख्यमंत्री साहेबांनी केलेले आहे. त्याच्याबरोबर आयोगाचे अध्यक्ष सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी बनवलं. मग आता मित्राबद्दल निर्णय घेताना जर विद्यार्थ्यांकडून मागणी होत असेल मित्राला हटवा तर दोन-तीन दिवसात हा विषय व्हायला पाहिजे होता. पण एवढा काळ जर हा विषय खेचला जात असेल तर मुख्यमंत्रीसाहेब मित्राचा विचार जास्त करत आहेत. सामान्य परिवारातील विद्यार्थ्यांचा करत नाही हे कुठे तरी सिद्ध होतंय. कारण भीमनवारांना टार्गेट करत असताना ज्या व्यक्तीच्या हातामध्ये हा निर्णय आहे म्हणजे मुख्यमंत्रीसाहेबांनासुद्धा टार्गेट करावं लागेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us