Sharad Pawar Health Update: शरद पवार यांची प्रकृती कशी आहे? डॉक्टरांनी दिली माहिती

Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना काल रात्री ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी अपडेट दिली आहे.

Sharad Pawar Health Update: शरद पवार यांची प्रकृती कशी आहे? डॉक्टरांनी दिली माहिती
Sharad Pawar health update
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 05, 2026 | 10:22 AM

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना कालीच्या वेळी पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोग्याशी संबंधीत काही समस्यांमुळे त्यांना मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. तसेच शरद पवार यांच्या लेक, खासदरा सुप्रिया सुळे यांनी व्हॅटअॅप स्टेटसद्वारे रुटीन चेकअपसाठी शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती दिली. आता त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना बरे वाटत नसल्यामुळे पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शरद पवार यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. “शरद पवार यांना काल रात्री ब्रिचकँडीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना कफ आणि श्वासनलिकेतील संसर्गचा आजार आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे” असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

Loading...

सुप्रिया सुळेंनी दिली होती माहिती

शरद पवार यांना पुढील तपासणीसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सुप्रिया सुळे यांनी हॉटस्अप स्टेटच्या माध्यमातून सांगितले होते. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना अचानक कफाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुण्यातील रूबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांना आता ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

रोहित पवारांनी दिली माहिती

आमदार रोहित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “प्रकृती चांगली आहे, रुबी हॉल येथे नॉर्मल तपासणी साठी ठेवण्यात आलं होतं. दर 4 ते 5 महिन्यानंतर त्यांची तपासणी करावी लागते.. दुसरीकडे बाहेर दौऱ्यावर असताना वायरल इन्फेक्शन असू शकतात. त्या अनुषंगाने नॉर्मल तपासणी करण्यात आली. मुंबईला सुद्धा पुन्हा एकदा तपासणी करून घ्यावी, असं सुप्रियाताई आणि सर्व घरच्यांचं मत होतं. त्यामुळेचं मुंबई येथे तपासणीसाठी नेण्यात आले.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us