शरद पवार कायमच दैवत राहतील, राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजीत सिंह भाजपमध्ये

उस्मानाबादमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेत राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील आणि डॉ. पद्मसिंह पाटील या पितापुत्रांनी भाजपप्रवेशाची घोषणा केली.

शरद पवार कायमच दैवत राहतील, राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजीत सिंह भाजपमध्ये
Follow us
| Updated on: Aug 31, 2019 | 2:28 PM

उस्मानाबाद : माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील (Padmasinh Patil) आणि राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं. राष्ट्रवादी सोडण्यापूर्वी उस्मानाबादमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेत पाटील पितापुत्रांनी ही घोषणा केली, मात्र या मेळाव्यात मनसेचं गाणं ऐकू आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.

‘दादा… नवी दिशा, नवी आशा… मला तुमच्याशी काही बोलायचंय!! परिवार संवाद, आवर्जून उपस्थित राहा’ अशी भावनिक साद घालत राणा जगजीतसिंह यांनी कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. या मेळाव्याकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली, तर दोन-अडीच हजार कार्यकर्ते उपस्थित राहिल्याचं बोललं जातं. मात्र यापेक्षा चर्चा होती मेळाव्यात वाजणाऱ्या गाण्याची.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मेळाव्यात वाजणारं ‘तुमच्या राजाला साथ द्या’ हे गाणं यावेळी लावण्यात आलं होतं. त्यामुळे राणा जगजीतसिंह नेमके भाजपच्या वाटेवर आहेत, की मनसेमध्ये, याची गमतीदार चर्चा रंगली होती. मात्र अखेर पाटील यांनी भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब केलं आणि कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला.

पाहा व्हिडीओ

सत्ता भिरकावून देऊ, माझी अवस्था अर्जुनासारखी झाली आहे, पण तुम्ही आता कृष्ण होऊन मला दिशा द्यायचं काम करा, निर्णय काय घेऊ हे सांगा, अशी भावनिक साद राणा जगजीतसिंह यांनी आधी कार्यकर्त्यांना घातली होती. समर्थकांसमोर साष्टांग लोटांगण घालू वाटत असल्याच्या भावनाही त्यांनी बोलून दाखवल्या होत्या.

राज्यमंत्री झाल्यावर 15 वर्ष संघर्ष करत प्रामाणिक काम केलं. सकारात्मक आणि विकासात्मक राजकारण करत कुणावर टीका करायची नाही. आजचा दिवस भावनिक असून शरद पवार हे आदरणीय दैवत आहेत, त्यात कमी होणार नाही, असंही राणा जगजीतसिंह म्हणाले.

राष्ट्रवादीसोबत काम केलं आहे. 2009 चा पराभव आठवतोय. सगळ्यांनी मेहनत घेतली. ताकद वाढवत गेलो, पण लोकसभेपूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. देशाने, राज्याने काय कौल दिला, हे आपण बघितलं आहे. मंत्र्यांना अडणारा जिल्हा हा उस्मानाबादच ठरला आहे, असंही राणा जगजीतसिंह म्हणाले.

20 वर्ष संघर्ष करुन उजनीवरुन पाणी आणलं. पण आता ते पाणी आणि उद्योग आपल्या हातात आले पाहिजे. मोठे उद्योग, रोजगार आणायचे असतील तर ताकद वाढवावी लागेल. सगळं काही करुनही निकाल आपल्या विरोधात जात असतील, तर काय करायचं ते तुम्हीच सांगा. खरंच आपण काम केलं असेल तर मग आपण कमी कुठे पडतोय हे बघितलं पाहिजे, असा प्रश्न राणा जगजीतसिंह यांनी कार्यकर्त्यांना विचारला.

सर्व जण मिळून भाजपात जाणार आहोत. पाणी, रोजगार आणि विकासासाठी भाजपमध्ये जाणार असल्याचं राणा जगजीतसिंह यांनी जाहीर केलं. मतदारसंघ कोणता हे आताच सांगणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पवनराजे हत्याकांड केसला घाबरुन निर्णय घेत नसल्याचंही राणा जगजीतसिंह म्हणाले.

संबंधित बातम्या :

ज्यांच्या प्रश्नावरुन शरद पवार संतापले, ते पद्मसिंह पाटील आज राष्ट्रवादी सोडण्याची घोषणा करणार?

या 10 दिग्गजांचा अमित शाहांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश निश्चित?

नातेवाईक सोडून का चालले? प्रश्न विचारताच शरद पवार संतापले, माफीची मागणी

राष्ट्रवादीला मराठवाड्यात हादरा, आमदार राणा जगजीतसिंह वडील पद्मसिंह पाटलांसह भाजपच्या वाटेवर

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.