ठाण्यात मनसेच्या कार्यालयात राष्ट्रवादीची होळी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढत्या जवळीकीनंतर, आता कार्यकर्तेही जवळ येत आहेत. ठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादीने एकत्र होळी साजरी केली. ठाण्यातील मनसे कार्यालयाजवळ राष्ट्रवादी आणि मनसे कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकमेकांना रंग लावून होळी सेलिब्रेट केली. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष तसंच लोकसभेचे उमेदवार आनंद […]

ठाण्यात मनसेच्या कार्यालयात राष्ट्रवादीची होळी
Follow us on

ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढत्या जवळीकीनंतर, आता कार्यकर्तेही जवळ येत आहेत. ठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादीने एकत्र होळी साजरी केली. ठाण्यातील मनसे कार्यालयाजवळ राष्ट्रवादी आणि मनसे कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकमेकांना रंग लावून होळी सेलिब्रेट केली. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष तसंच लोकसभेचे उमेदवार आनंद परांजपे यांनी एकमेकांना रंग लावले.

येत्या 23 मे रोजी म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशी मनसे-राष्ट्रवादी गुलाल उधळणार, असं यावेळी आनंद परांजपे आणि अविनाश जाधव म्हणाले. आज होळीच्या निमित्ताने मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकाच रंगात रंगल्याचे पहायला मिळाले.

दरम्यान, मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी कोणाला फायदा व्हायचा ते होऊ दे, मात्र नरेंद्र मोदी-अमित शाह यांना पराभूत करा, असा आदेश मनसैनिकांना दिला आहे. शिवाय त्याआधी मनसेला राष्ट्रवादीने महाआघाडीत येण्याचं आवाहन केलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे आणि राष्ट्रवादीची जवळीक वाढली आहे. त्याची प्रचिती आज होळीच्या निमित्ताने ठाण्यात पाहायला मिळाली.

शरद पवार मनसेच्या व्यासपीठावर?

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी 20 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या घरी जाऊन राज ठाकरे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. राज ठाकरे यांनी या भेटीत शरद पवारांना मनसेच्या पाडवा मेळाव्याचं निमंत्रण दिल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर 6 एप्रिलला मनसेचा गुढीपाडव्यानिमित्त मेळावा आहे. या मेळाव्यासाठी राज यांनी शरद पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

संबंधित बातम्या 

लवकरच शरद पवारही मनसेच्या व्यासपीठावर दिसणार?  

शरद पवारांची भेट घेऊन 15 मिनिटात राज ठाकरे बाहेर, अजित पवार आत   

मनसेच्या माघारीने शिवसेना, राष्ट्रवादीच्या गालावर खळी, मतं खेचण्याचा प्रयत्न  

मनसे लोकसभा निवडणूक लढणार नाही!