मनसे लोकसभा निवडणूक लढणार नाही!

मनसे लोकसभा निवडणूक लढणार नाही!

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2019 च्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मनसे आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे पत्रक मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. मनसेचे नेते शिरीष सावंत यांनी हे पत्रक प्रसिद्ध केले आहे.

येत्या 19 मार्च रोजी राज ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे परवा म्हणजे 19 तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिक जाहीर करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला या लोकसभा निवडणुकीत मनसे पाठिंबा देण्याची शक्यता आहे. तशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यामुळे येत्या 19 तारखेला राज ठाकरे राष्ट्रवादीला पाठिंब्याची भूमिका जाहीर करतात का, याचीही उत्सुकता महाराष्ट्राला आहे.

मनसेने नुकतंच पक्षाचा 13 वा वर्धापन दिन साजरा केला. पक्षाच्या 13 वर्षांच्या वाटचालीनंतर अधिकाधिक जागा लढवण्याऐवजी निवडणुकीतूनच माघार घेत असल्याने मनसेच्या ताकदीबाबत अनेकजण शंका उपस्थित करत आहेत. मात्र, लोकसभा निवडणूक न लढण्यामागची राज ठाकरेंची रणनिती आता 19 तारखेलाच कळू शकेल.

मनसेचं पत्रक :

Published On - 6:09 pm, Sun, 17 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI