Dhananjay Munde | मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार नाही, आम्ही आमचा निर्णय घेऊ : शरद पवार

| Updated on: Jan 14, 2021 | 2:36 PM

धनंजय मुंडेंवरील आरोपानंतर मुख्यमंत्री अद्याप निर्णय का घेत नाही, असा सवाल विरोधक विचारत आहेत. यावरच शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं

Dhananjay Munde | मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार नाही, आम्ही आमचा निर्णय घेऊ : शरद पवार
Follow us on

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवरील (Dhananjay Munde) आरोपांचं स्वरुप गंभीर आहे, आणि त्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या (CM Uddhav Thackeray) निर्णयाची वाट पाहावी लागणार नाही. जे काही निर्णय घ्यावे लागतील, ते आम्हीच तातडीने घेऊ, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. त्यामुळं आता धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. रेणू शर्मा नावाच्या महिलेनं धनंजय मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार दिली होती, त्यांनंतर धनंजय मुंडेंनी रेणूच्या बहिणीसोबत आपले सहमतीनं संबंध असल्याचं फेसबुक पोस्टमधून कबूल केलं होतं. त्यानंतर आता हा वाद वाढताना दिसतो आहे. (NCP President Sharad Pawar on Dhananjay Munde Controversy)

धनंजय मुंडेंकडून शरद पवारांची भेट

धनंजय मुंडेंनी बुधवारी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सर्व माहिती दिल्याचं पवारांनी सांगितलं. ते म्हणाले, धनंजय मुंडे मला काल भेटले आणि आरोपाची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार काही व्यक्तींसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यातूनच या तक्रारी तयार झाल्या आहेत. याबाबत हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केली आहे. त्याबाबत कोर्टात सुनावणी होणं बाकी असल्याचं पवारांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाआधी पक्ष निर्णय घेईल

धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपानंतर आता मुख्यमंत्री अद्याप निर्णय का घेत नाही असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. यावर बोलताना पवारांनी सांगितलं की, मुख्यमंत्री निर्णय घेण्याआधी धनंजय मुंडेंबाबत पक्षच निर्णय घेईल. मुंडेवरील आरोप गंभीर आहेत, त्यामुळे मला आधी माझा निर्णय घेऊ द्या, मुख्यमंत्र्यांचं नंतर बघू असं वक्तव्य पवारांनी आज केलं. पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वानुमते निर्णय होईल. त्यासाठी आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहण्याची गरज नाही. या निर्णयात कुणावर अन्याय होणार नाही हे पाहणं अधिक महत्त्वाचं असल्याचंही पवारांनी सांगितलं.

Video : धनंजय मुंडेंबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रीया

संबंधित बातम्या:

 

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला का? शरद पवार म्हणतात, “आरोप गंभीर…”

पक्ष म्हणून काळजी घ्यावी लागेल, तातडीने निर्णय घेऊ : शरद पवार

पंकजांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा ते धनंजय मुंडेप्रकरणावर भाष्य, जयंत पाटील यांचे 3 मोठे मुद्दे

‘प्यार किया तो डरना क्या?’, मंत्री अब्दुल सत्तार धनंजय मुंडेंच्या मदतीला!

 

(NCP President Sharad Pawar on Dhananjay Munde Controversy)