धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला का? शरद पवार म्हणतात, “आरोप गंभीर…”

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत, पक्ष म्हणून आम्हाला निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असं शरद पवार म्हणाले (Sharad Pawar Dhananjay Munde )

  • सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 14:07 PM, 14 Jan 2021

मुंबई : बलात्काराचे आरोप झाल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे, याविषयी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना, तुमच्याकडूनच मला नवी माहिती मिळत आहे, मला याविषयी काहीही माहिती नाही, असं उत्तर देत पवारांनी चेंडू टोलवला. (Sharad Pawar reacts on Dhananjay Munde alleged Rape Case)

शरद पवार काय म्हणाले?

नवाब मलिक यांच्यावरील आरोपाबाबत झालं तर त्यांच्यावर व्यक्तिगत आरोप नाहीत. त्यांच्या नातेवाईकावर आरोप झाला आहे. याबाबत संबंधित यंत्रणेने अटक केली आहे. त्या यंत्रणेने पूर्ण सहकार्य केलं आहे. तपास यंत्रणा त्या पद्धतीने काम करेल अशी अपेक्षा आहे. त्यांना पूर्ण सहकार्य संबंधितांकडून केलं जाईल याची काळजी घेतली जाईल, असं शरद पवार म्हणाले.

दुसरी गोष्ट- नवाब मलिकांवर वैयक्तिक आरोप नाहीत. ते अनेक वर्षापासून महाराष्ट्रासाठी काम करतात. विधीमंडळात ते काम करतात. त्यांच्यावर आजपर्यंत आरोप झालेला नाही, याकडेही शरद पवारांनी लक्ष वेधलं.

धनंजय मुंडे काल मला स्वत: भेटले. मला भेटून एकंदर त्यांच्या आरोपाच्या स्थितीची सविस्तर माहिती मला दिली. त्यानुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यानंतर काही तक्रारी झाल्या. त्याबाबत चौकशी सुरु झालेली असेल. हे प्रकरण असं होईल, व्यक्तीगत हल्ले होतील, असा अंदाज त्यांना असावा, त्यामुळे त्यांनी हायकोर्टात यापूर्वीच जाऊन आपली भूमिका मांडली आणि कोर्टाचा एक प्रकारचा आदेश होता, त्यावर भाष्य करण्यात अर्थ नाही, असंही पवार म्हणाले.

तिसरा मुद्दा धनंजय मुंडेंवरचा आरोप आणि स्वरुप – माझ्या मते त्या आरोपाचं स्वरुप गंभीर आहे, साहजिकच याबाबत पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल. यासाठी पक्षाचे प्रमुख सहकारी आहेत, त्यांच्याशी अद्याप बोलणं झालेलं नाही. पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागतील, काळजी घ्यावी लागेल ते तातडीने निर्णय घेऊ, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

मला आधी माझा निर्णय घेऊ द्या, नंतर मुख्यमंत्र्यांचं बघू. आम्हाला आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करुन पुढची भूमिका काय असावी, याचा विचाराने निर्णय होईल. त्यासाठी आम्ही आमचा निर्णय घेऊ, त्यासाठी आम्हाला मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी लागणार नाही. आम्हाला पक्षप्रमुख म्हणून निर्णय घ्यावे लागतील. त्यामध्ये कुणावर अन्यायही होणार नाही हे पाहावे लागेल, असंही शरद पवार म्हणाले.

संबंधित बातम्या :

पंकजांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा ते धनंजय मुंडेप्रकरणावर भाष्य, जयंत पाटील यांचे 3 मोठे मुद्दे

धनंजय मुंडे पहाटेपासून शासकीय बंगल्यात, समर्थक आणि अधिकारीही जमले

(Sharad Pawar reacts on Dhananjay Munde alleged Rape Case)