AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: धनंजय मुंडेंना चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावणार?

रेणू शर्मा या गुरुवारी सकाळी डीएन नगर पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. | Renu Sharma Rape accusations on Dhananjay Munde

मोठी बातमी: धनंजय मुंडेंना चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावणार?
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पोलिसांची भेट घेतली. यानंतर आता पोलिसांकडून धनंजय मुंडे यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.
| Updated on: Jan 14, 2021 | 1:44 PM
Share

मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. कारण, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा (Renu Sharma) यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पोलिसांची भेट घेतली. यानंतर आता पोलिसांकडून धनंजय मुंडे यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने महाविकासआघाडी सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. (Dhananjay Munde in big trouble Mumbai Police may call him for probe)

रेणू शर्मा या गुरुवारी सकाळी डीएन नगर पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. याठिकाणी त्यांनी सहाय्यक पोलिस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना आपल्यावरील सर्व अत्याचारांची माहिती दिली. त्यामुळे आता पोलिसांकडून धनंजय मुंडे यांची बाजू ऐकून घेण्यासाठी त्यांना डीएन नगर पोलीस ठाण्यात बोलावले जाण्याची शक्यता आहे.

ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार

रेणू शर्मा नावाच्या एका गायिकेनं धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. मुंडे यांनी आपल्याला बॉलिवूडमध्ये संधी देण्याचं आणि लग्नाचं आमिष दाखवून सातत्यानं बलात्कार केल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात तरुणीने ओशिवरा पोलीस ठाण्यात 10 जानेवारीला तक्रार केली. याप्रकरणी 11 जानेवारीला रोजी मुंबई पोलिसांकडून अर्ज स्वीकारण्यात आला. तरुणीने केलेल्या आरोपांनुसार 2006 पासून अत्याचार सुरु असल्याचा दावा तिने केला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपली बाजू सविस्तरपणे मांडली आहे.

रेणू शर्मा यांच्या वकिलांचे पोलिसांवर आरोप

रेणू शर्मा यांची एफआयआर आज नोंदवून घेतली नाही तर उद्या आम्ही न्यायालयात धाव घेऊन, असे अ‍ॅडव्होकेट रमेश त्रिपाठी यांनी सांगितले. तसेच एसीपी ज्योत्सना रसाळ या धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून तपास झाल्यास पीडित महिलेला न्याय मिळणार नाही. त्यामुळे आम्हाला याप्रकरणाच्या तपासासाठी दुसरा पोलीस अधिकारी मिळावा, अशी मागणी रेणू शर्मा यांच्या वकिलांनी केली.

धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्यावर लावलेला खंडणीखोरीचा आरोप पूर्णपणे खोटा आहे. कारण रेणू शर्मा यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्या सध्या पीजी रूममध्ये वास्तव्याला आहेत, असे अ‍ॅडव्होकेट रमेश त्रिपाठी यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत महत्त्वाची बैठक

धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांमुळे महाविकासआघाडी सरकार अडचणीत येणार, हे दिसू लागल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित आहे.

काय आहेत रेणू शर्मा याचे आरोप?

रेणू शर्मा या एक बॉलिवूड गायिका आहे. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची ओळख 1997 मध्ये झाली. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे हे मध्यप्रदेशातील इंदोरमध्ये बहिण करुणा शर्मा यांच्या घरी भेटले. त्यावेळी रेणू शर्मा यांचे वय 16-17 इतके होते. धनंजय मुंडे आणि करुणा या दोघांचा 1998 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर 2006 मध्ये करुणा या प्रसूतीसाठी इंदोरमध्ये गेली होती.

आपण घरात एकटी आहे, हे धनंजय मुंडेना माहिती होतं. त्यावेळी धनंजय मुंडे काहीही न सांगता रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप रेणू शर्मा यांनी केला आहे. त्यानंतरही मुंडे यांनी आपल्याला बॉलिवूडमध्ये संधी देण्याचं आणि लग्नाचं आमिष दाखवून सातत्यानं बलात्कार केल्याचे रेणू शर्मा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

संबंधित बातम्या:

जयंत पाटील यांचे एकाच दगडात दोन पक्षी, धनंजय मुंडे आणि मेहबूब शेख प्रकरणावर प्रतिक्रिया

राजकारण्यांनी भान ठेवावं, धनंजय मुंडे प्रकरणात संजय राऊतांचं भाष्य

ना पोलीस, ना सुरक्षारक्षकांचा ताफा, धनंजय मुंडे भल्या पहाटे एकटेच चित्रकूट बंगल्यावर

(Dhananjay Munde in big trouble Mumbai Police may call him for probe)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.