Nitesh Karale : विधानपरिषद निवडणुकीत किंगमेकर ठरताच कोणत्या पक्षात जाणार कराळे मास्तरांनी सांगून टाकलं…
शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावर स्टार म्हणून प्रसिद्ध असलेले नितेश कराळे मास्तर आणि रविराज साबळे पाटील यांनीही अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांनाही प्रचंडल मतदान मिळालं आहे. त्यांच्याशी टीव्ही9 ने संवाद साधलाय.

विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमधला निकाल सध्या चर्चेत आहे. त्यानंतर महायुतीमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. यावेळी प्रस्थापितांना धक्का देत आपली वेगळ ओळख निर्माण करणारे दोन चेहरे यानिमित्ताने चर्चेत आलेले आहेत. एक म्हणजे नागपूर पदवीधरमधून नितेश कराळे आणि मराठवाडा पदवीधरमधून रविराज साबळे. हे दोघेही या निवडणुकीत अपक्ष होते.
यावेळी नितेश कराळे म्हणाले आपण किंग मेकर बनलो आहोत. मला बीजेपी आणि काँग्रेस खूप हलक्यात घेत होती. त्यांना असं वाटायचं की मला हार्डली चार पाच हजार मतदान मिळेल पण मला लोकांनी भरघोस मतदान केलं. मी लोकांचे काम करत होतो. त्यामुळे माझ्या अंगावर १०० च्या वर केसेस आहेत. मला फॉर्म भरताना ८ दिवस लागले. या केस लोकांचे प्रश्न रस्त्यावर मांडताना लागल्या आहेत. त्यामुळे मी माझ्या जीवाचाही विचार केला नाही. मी निवडणुकीआधी पंधरा दिवस जेलमध्ये राहिलो. हे लोकांना माहित होतं. त्यामुळे लोकांना माहित होतं कराळे काही मॅनेज होत नाही. त्यामुळे मला मतदान मिळालं. मला २५ हजार मतदान भेटलं. त्यामध्ये ८ हजार त अवैध ठरलेलं होतं. मला जवळपास ३३ हजार मतदान पडलं. ही माझ्या कामाची पोचपावती आहे, असं कराळे मास्तर म्हणाले आहेत.
दरम्यान, कराळे मास्तरांना मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात एवढं मतदान आहे, त्यामुळे सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांना बीजेपीच्या आमदारांना झापलं अशी माहिती माझ्या कानावर आली. देवेंद्र फडवणीसांच्या आणि आरएसएसच्या बालेकिल्ल्यात १० हजार मतदान मिळालंच कसं, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. कोणाला काय शिक्षा द्यायची हा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, पवारांसोबत मी परत जाणार नाही. पण ते माझे आदर्श आहेत, असंही त्यांनी म्हटलं. मला त्यांच्यासोबत फिरता आलं हे माझं भाग्य आहे. त्यांच्याबद्दल मानसन्मान आहे आणि राजकारण शिकायला मिळालं आहे. मी माझं वेगळं अस्तित्व दाखवून दिलं आहे. पुढेही निवडणुका आहेत त्याकडे माझं लक्ष आहे.
भाजपमधून ऑफर आली तर तुम्ही काय कराल यावर बोलताना कराळे म्हणाले की, नाही. मी भाजपसोबत कधीच जाणार नाही. मुख्यमंत्री बोलवणार असतील तरीही जाणार नाही, असं स्पष्ट मत नितेश कराळे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. शिव-शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहोत. त्यामुळे आम्ही भाजपसोबत जाऊ शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. गेलो तर तिथेही शिव-फुले-शाहु-आंबेडकरांचा झेंडा गाडल्याशिवाय राहणार नाही.