…तर देवी सरस्वतीही वाचवू शकणार नाही; नितेश राणेंचा भुजबळांना इशारा!

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात चेंबुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी छगन भुजबळ यांच्यावर ट्विट करत जोरदार हल्लाबोल केला आहे.

...तर देवी सरस्वतीही वाचवू शकणार नाही; नितेश राणेंचा भुजबळांना इशारा!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 11:02 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याविरोधात चेंबुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप व्यावसायिक ललितकुमार टेकचंदानी यांनी भुजबळांवर केला आहे. या प्रकरणात टेकचंदानी यांच्या तक्रारीनंतर छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी छगन भुजबळ यांच्यावर ट्विट करत जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात हिंदुत्वाचं सरकार आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा नितेश राणे यांनी भुजबळांचं नाव न घेता दिला आहे. तसेच या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी खासदार राहुल शेवाळे आणि भाजप आमदार अमित साटम यांनी केली आहे.

नितेश राणेंनी काय म्हटलं?

नितेश राणे यांनी छगन भुजबळ यांचं नाव न घेता ट्विटरच्या माध्यमातून त्यांना जोरदार टोला लगावा आहे. ‘चेंबूर येथील व्यावसायिकाला देवी सरस्वतीचा द्वेष करणाऱ्या राजकारण्याकडून धमकी, एफआयआर नोंदवला आहे. आता देवी सरस्वतीही वाचवू शकणार नाही, महाराष्ट्रात आता हिंदुत्वाचे सरकार आहे.. ये याद रखना’! असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

चौकशीची मागणी

दरम्यान दुसरीकडे ललितकुमार टेकचंदानी यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकणाची तातडीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी  खासदार राहुल शेवाळे आणि भाजप आमदार अमित साटम यांनी केली आहे. या प्रकरणात छगन भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

भुजबळांच्या अडचणी वाढणार?

छगन भुजबळ यांच्याविरोधात धमकी दिल्याचा आरोप करत ललितकुमार टेकचंदानी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. टेकचंदानी यांच्या तक्रारीवरून भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी व्हावी अशी मागणी खासदार राहुल शेवाळे आणि भाजप आमदार अमित साटम यांनी केली आहे. त्यामुळे भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  या वादात आता नितेश राणे यांनी देखील उडी घेत भुजबळांवर निशाणा साधला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.