सोलापूर-नगर-नाशिक-सुरत ग्रीनफिल्ड हायवे होणार, 50 हजार कोटी रुपयांच्या रस्त्याची गडकरींची घोषणा

नितीन गडकरी यांनी 'सूरत-नाशिक-सोलापूर अहमदनगर ग्रीन फिल्ड एक्सप्रेस हायवे'ची घोषणा केली. या हायवेच्या माध्यमातून राज्यातील ट्राफिक पूर्णपणे कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा गडकरी यांनी केलाय.

सोलापूर-नगर-नाशिक-सुरत ग्रीनफिल्ड हायवे होणार, 50 हजार कोटी रुपयांच्या रस्त्याची गडकरींची घोषणा
नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 1:06 PM

अहमदनगर : केंद्रीय रस्त्ये वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अहमदनगरमध्ये आज 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटीच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी नितीन गडकरी यांनी ‘सूरत-नाशिक-सोलापूर अहमदनगर ग्रीन फिल्ड एक्सप्रेस हायवे’ची घोषणा केली. या हायवेच्या माध्यमातून राज्यातील ट्राफिक पूर्णपणे कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा गडकरी यांनी केलाय. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याच्या विकासात हा हायवे एक मैलाचा दगड ठरणार असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. (Nitin Gadkari announces Solapur-Nagar-Nashik-Surat Greenfield Express Highway)

कसा असेल हायवे?

सूरत-नाशिक-सोलापूर-अहमदनगर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवे. या रस्त्याला पूर्ण ग्रीन अलाईन्मेंट आहे. हा रस्ता सूरत ते चेन्नई पर्यंत जाणार आहे. यात पंजाब, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर, दिल्ली, राजस्थान, गुजरात इथला सगळा ट्राफिक येतो मुंबईत. मुंबईवरुन सोलापूर, कोल्हापूरवरुन तो दक्षिणेत जातो. त्यामुळे मुश्रीफसाहेब कोल्हापूरचंही ट्राफिक जाम कमी होईल, सोलापूरचाही कमी होईल आणि हा सगळा सूरतवरुन वळेल. हा रस्ता हा अॅक्सेस कंट्रोल एक्सप्रेस हायवे आहे. परवा मी मुंबई-दिल्ली एक्सप्रेस हायवेवर होतो. त्यावर मी जेव्हा ट्रायल घेतली तेव्हा गाडी 140 किमी प्रतितास गाडी चालली. नंतर 170 किमी प्रति तास वेगाने गाडी चालली तेव्हा पोटातलं पाणीही हललं नाही. आपल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे पेक्षा रुंदीला तीन पट मोठा आहे. आता 70 टक्के काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे सगळा ट्राफिक आता सूरतवरुन वळेल, असं गडकरी म्हणाले.

अहमदनगर जिल्हा आता हायवेच्या मेन लाईनवर येणार

त्याचबरोबर सूरतवरुन हा जो इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. देशातील महत्वाचा हा सूरत, नाशिक, सोलापूर, अहमदनगर, अक्कलकोट, करनूल आणि चेन्नई, तिकडूनच पुढे बंगळुरू, तिथून कोचिन, तिथून हैदराबादकडे रस्त्याने जाता येईल. म्हणजे पूर्ण दक्षिणेची ट्रान्सपोर्ट इथून होणार. तेव्हा या रस्यावरची अहमदनगरची लांबी 180 किमी आहे. याचा फायदा असा की अहमदनगर जिल्हा आता रस्त्याच्या मेन लाईनवर येणार आहे. यावर खूप ट्राफिक राहिल त्यामुळे या रस्त्याच्या आजूबाजुला तर पडिक सरकारी जागा असतील त्या जर तुम्ही NHAI ला दिल्या तर त्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क, इंडस्ट्रियल क्लस्टर, रोड साईड अॅमिनिटीज आम्ही आमच्या पैशाने बांधायला तयार आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बिझनेसमध्ये यात फायदा होईल. अहमदनगर जिल्ह्यातच केवळ या रस्त्यावर 8 हजार कोटी रुपये आम्ही खर्च करणार आहोत. टोटल रस्त्याची किंमत 50 हजार रुपये आहे. यात महाराष्ट्रात या रस्त्याची एकूण लांबी 481 किमी आहे. यासाठी अकराशे पन्नास हेक्टर जमीन आम्ही अधिग्रहित करणार आहोत, असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

गडकरींनी दूध उत्पादनाबाबतचा किस्सा सांगितला

नितीन गडकरींनी दूध उत्पादनाबाबतचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, एकदा राज्याचे पशू आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार हे मदर डेअरिच्या मीटिंगला आले होते. त्यावेळी मी मदर डेअरचे चेअरमन आणि भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला, आमच्याकडे 3 लाख लिटर दूध कलेक्शन होतं, ते 10 लाख लिटर कसं होईल.

त्यानंतर मी सुनील केदार आणि अधिकाऱ्यांसमोर सर्वांना प्रश्न केला, एकट्या पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात जेवढं दूध होतं, तेवढं अख्ख्या विदर्भात होत नाही, याची आम्हाला लाज आणि शरम वाटते, तुम्हाला वाटते की नाही मला माहिती नाही. पण सुनील केदार आणि मला वाटते, म्हणून आपल्याला ग्रामीण भागात, विशेषत: आपल्या भागामध्ये दुधाच्या उत्पादानमुळे शेतकरी संपन्न झाला, समृद्ध झाला. आत्महत्या करत नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.

इतर बातम्या :

सुजय विखे म्हणाले, नगरला सर्वाधिक रस्ते मिळाले, गडकरी म्हणाले, ‘जिकडं जाईल तिकडचे असेच म्हणतात!’

प्रत्येक भाषणात नितीन गडकरी म्हणतात ऊसापासून इथेनॉल निर्मिती करा, आज पवारांनी त्याच्या पुढचा पर्याय गडकरींना सांगितला!\

Nitin Gadkari announces Solapur-Nagar-Nashik-Surat Greenfield Express Highway

Non Stop LIVE Update
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.