NITIN GADKARI आज सांगली दौऱ्यावर, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण

| Updated on: Mar 26, 2022 | 11:25 AM

केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज सांगली दौऱ्यावर आहेत. आज गडकरी यांचे सांगली शहरात 3 कार्यक्रम असून भिवघाट येथे गडकरी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

NITIN GADKARI आज सांगली दौऱ्यावर, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण
लोकार्पण सोहळा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सांगली – केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin gadkari) आज सांगली (Sangli) दौऱ्यावर आहेत. आज गडकरी यांचे सांगली शहरात 3 कार्यक्रम असून भिवघाट येथे गडकरी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शेतकरी मेळाव्यास गडकरी उपस्थित राहणार असल्याने तिथं नेमकं ते काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे गडकरी यांच्या हस्ते आज 2 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार आहे. सांगली ते सोलापूर (Solapur)या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 मधील बोरगाव ते वाटंबरे दरम्यानच्या 52 किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरण रस्त्या आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 जी, यावरील सांगोला ते सोनंद ते जत या मार्गाचा लोकार्पण सोहळा आज होणार आहे. नितीन गडकरी यांच्या हस्ते राजमती ग्राऊंड नेमिनाथनगर, सांगली येथे येथे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या कार्यक्रमाला पालकमंत्री जयंत पाटील चंद्रकांत दादा पाटील माजी मंत्री सुभाष देशमुख, माजी आमदार गोपीचंद पडळकर नेते उपस्थित राहणार आहेत.

अभिनेते राहुल सोलापूरकर गडकरीची मुलाखत घेतील

दुसरा कार्यक्रम सांगलीतील खरे क्लब हाऊस मध्ये पार पडणार असून त्या ठिकाणी PNG सराफ पेढीच्या 190 व्या वर्धापन दिनानिमित्त नितीन गडकरी यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनेते राहुल सोलापूरकर गडकरीची मुलाखत घेतील. देशातल्या विकासाच्या संदर्भात मुलाखत होईल. त्याचबरोबर मोदींच्या काळात विकास कशा पध्दतीने झाला याची माहिती देण्यात येणार असल्याचं समजतंय.

अत्याधुनिक हॉस्पिटलच्या लोकार्पण

तिसरा कार्यक्रम हा उष:काल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, सांगली यांच्या 350 बेड्सचे अत्याधुनिक हॉस्पिटलच्या लोकार्पणचा आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकामधील भव्य अशा या हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कोविड टास्क फोर्सचे डॉ.संजय ओक, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

गडकरींची शेतकरी मेळाव्याला भेट

चौथा कार्यक्रम हा नितीन गडकरी यांचा सत्काराचा व शेतकरी मेळाव्याचा असून तो भिवघाट येथील विश्वचंद्र मंगल कार्यालय मध्ये पार पडणार आहे. सांगली जिल्ह्याला गडकरी यांच्या माध्यमातून रस्त्यांसाठी व ताकारी टेंभू म्हैसाळ तसेच रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरण या कामासाठी मोठा निधी मिळवून दिल्याबद्दल गडकरी यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

‘सीएनजी’वरील व्हॅट कपातीची अधिसूचना जारी, एक एप्रिलपासून लागू होणार सुधारित दर

Gold, silver prices : सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदीही दीड हजारांनी महागली; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

मालेगावमध्ये आता पोलिओ लसीकरणाकडेही पाठ; 3500 डोस पडून, प्रकरण काय?