AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Gadkari | मत द्यायचय द्या, नाही द्यायचय नका देऊ, पण राजकारणात खोट बोलण्याची गरज नाही – नितीन गडकरी

Nitin Gadkari | भारत सरकार आणि राज्य सरकारला ऑटोमोबाइल इंडस्ट्रीकडून सर्वाधिक जीएसटी मिळतो. ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमध्ये दोन महिन्यांपूर्वी भारताने जापानला मागे टाकलय.

Nitin Gadkari | मत द्यायचय द्या, नाही द्यायचय नका देऊ, पण राजकारणात खोट बोलण्याची गरज नाही - नितीन गडकरी
nitin gadkari Image Credit source: socialmedia
| Updated on: Sep 30, 2023 | 11:52 AM
Share

वाशिम : महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यात रस्त्याच्या लोकार्पणाचा एक कार्यक्रम झाला. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात एक मोठ वक्तव्य केलं. “राजकारणात खोटं बोलण्याची आवश्यकता नाहीय. मी मागच्या 40-45 वर्षात बोललो ते करुन दाखवलं. तुम्ही जे बोलला होता, ते का नाही झालं? असा कुणी पत्रकार विचारु शकत नाही” असं नितीन गडकरी म्हणाले. अकोला ते वाशिमपर्यंत 133.85 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच लोकार्पण नितीन गडकरी यांच्याहस्ते झालं.

“मी जे काही बोललो, ते केलं नाही असं कोणी म्हणू शकत नाही. जे बोलतात ते करतात आणि जे करतात तेच बोलतात. राजकारणात खोटं बोलण्याची गरज नाही. मी ठरवलय यावेळी लोकसभा निवडणुकीच्यावेळी पोस्टर-बॅनर लावणार नाही. चहा-पाणी करणार नाही. मत द्यायचय द्या, नाही द्यायचय नका देऊ. प्रामाणिकपणे सेवा करीन. कुठलीही माल-पाणी मिळणार नाही. लक्ष्मी दर्शन होणार नाही. देशी-विदेशी नाही मिळणार. मी पैसा खाल्ला नाही, तुम्हालाही खाऊ देणार नाही” असं नितीन गडकरी म्हणाले.

‘गरीब-गरीब असतो’

“तुमची सेवा प्रामाणिकपणे करीन. गरीब-गरीब असतो. गरीबाला जात, पंथ, भाषा नसते. सिलेंडर ज्या किंमतीला मुस्लिमांना मिळतो, त्याच किंमतीला हिंदूंना सुद्धा मिळतो. या देशातील गरीबी, उपासमारी आणि बेरोजगारी दूर करण्याची आवश्यकता आहे” असं गडकरी म्हणाले. ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमध्ये जापानला मागे टाकलं

“इंडिया इज द फास्टेस्ट ग्रोइंग इकोनॉमिक्स इन द वर्ल्ड. ऑटोमोबाइलमध्ये आपण 7 व्या नंबरवर होतो. आता तीच 12.50 लाख कोटीची इंडस्ट्री बनली आहे. 4.5 कोटी युवकांना रोजगार मिळालाय. भारत सरकार आणि राज्य सरकारला ऑटोमोबाइल इंडस्ट्रीकडून सर्वाधिक जीएसटी मिळतो. ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमध्ये दोन महिन्यांपूर्वी भारत जापानला मागे टाकून तिसऱ्या नंबरवर पोहोचलाय. पहिल्या नंबरवर अमेरिका, दुसऱ्या नंबरवर चीन आणि तिसऱ्या नंबरवर भारत आहे” असं नितीन गडकरी म्हणाले.

Follow Us
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल