NMC Election 2022 ward 29 : नागपूर महापालिकेत भाजपचं वर्चस्व कायम राहणार? काँग्रेस, राष्ट्रवादीनेही जोर लावला! प्रभाग क्रं. 29 ची स्थिती जाणून घ्या

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे दोन मोठे नेते नागपुरातूनच येत असल्याने त्यांच्या शब्दाला इथं मोठी किंमत आहे. असं असलं तरी आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांसारख्या नेत्यांनी नागपुरात पुन्हा एकदा काँग्रेसला उर्जितावस्था प्राप्त करुन देण्यासाठी जोरदार तयारी सुरु केलीय.

NMC Election 2022 ward 29 : नागपूर महापालिकेत भाजपचं वर्चस्व कायम राहणार? काँग्रेस, राष्ट्रवादीनेही जोर लावला! प्रभाग क्रं. 29 ची स्थिती जाणून घ्या
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 11:15 AM

मुंबई : राज्याची उपराजधानी आणि विदर्भातील राजकारणाचं प्रमुख केंद्र असलेल्या नागपूर महापालिकेवर (Nagpur Municipal Corporation) भाजपचं वर्चस्व आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे दोन मोठे नेते नागपुरातूनच येत असल्याने त्यांच्या शब्दाला इथं मोठी किंमत आहे. असं असलं तरी आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांसारख्या नेत्यांनी नागपुरात पुन्हा एकदा काँग्रेसला उर्जितावस्था प्राप्त करुन देण्यासाठी जोरदार तयारी सुरु केलीय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही नुकताच नागपूर दौरा करुन राष्ट्रवादीही नागपूर महापालिका निवडणुकीत जोरदारपणे उतरणार असल्याचं जणू स्पष्ट केलंय. असं असलं तरी राज्यातील सत्तापालटानंतर आता राज्यातील राजकीय समीकरणांचा प्रभाव नागपूर महापालिका निवडणुकीवर (Nagpur Municipal Election) पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनं उद्धव ठाकरे यांची शिवसेना कमकुवत भासत आहे. अशास्थितीत नागपूर महापालिकेत भाजप सत्ता कायम राखणार की, काँग्रेस, राष्ट्रवादी कमाल दाखवणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडी सरकारनं लागू केलेली त्रिसदस्यीय प्रभाग रचना शिंदे आणि फडणवीस सरकारनं रद्द केली आहे. आता 2017 च्या निवडणुकीप्रमाणेच चार सदस्यांचा प्रभाग असेल. त्यामुळे प्रभाग क्रमांक 29 मध्ये कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार रिंगणात उतरणार आणि कोण बाजी मारणार याकडे नागपूरकरांचं लक्ष लागलं आहे.

प्रभाग क्रमांक 29ची लोकसंख्या

2011 च्या जनगणनेनुसार प्रभाग क्रमांक 29 ची एकूण लोकसंख्या 54 हजार 93 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 3 हजार 747, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 3 हजार 482 इतकी आहे.

प्रभाग क्रमांक 29चे आरक्षण (31 मे 2022 च्या अधिसूचनेनुसार)

प्रभाग क्रमांक 29मध्ये वार्ड क्रमांक 29 (अ) सर्वसाधारण महिला, वार्ड क्रमांक 29 (ब) सर्वसाधारण महिला आणि वार्ड क्रमांक 29 (क) सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाला होता.

2017 मधील प्रभाग क्र. 29चे विजयी उमेदवार

वार्ड क्र. 29 (अ) – लिला अजय हातीबेद – भाजप वार्ड क्र. 29 (ब) – विद्या योगेश मडावी – भाजप वार्ड क्र. 29 (क) – भगवान बाबुराव मेंढे – भाजप वार्ड क्र. 29 (ड) – स्वाती चंद्रकांत आखतकर – भाजप

प्रभाग क्र. 29ची व्याप्ती :

श्रीकृष्णनगर, न्यू डायमंडनगर, गाडगेबाबानगर, पवतसुतनगर, धन्वंतरीनगर, रमना मारोती परीसर, ईश्वरनगर, निर्मल नगरी, चिटणीसनगर, वाठोडा लेआऊट, पंचवटी, विद्यानगर, शक्तीमातानगर, संकल्पनगर, शेषनगर, मित्रविहारनगर, न्यू सहकारनगर, सहकारनगर.

उत्तर : मिडल रिंगरोड वरील (हसनबाग रोड) ना.सु.प्र.चे कॉम्प्लेक्स जवळील भारत पेट्रोलियम पेट्रोलपंपापासून आग्नेय दिशेकडे जाणाऱ्या रस्त्याने रिंगरोड वरील वाठोडा चौकापर्यंत.

पूर्व : रिंगरोडवरील वाठोडा चौकापासून नैऋत्यदिशेकडे जाणाऱ्या रिंगरोडने रिंगरोडवरील दिघोरी चौकापर्यंत.

दक्षिण : रिंगरोडवरील दिघोरी चौकापासून वायव्य दिशेकडे जाणाऱ्या उमरेड रोडने उमरेड रोडवरील शितला माता मंदीर चौकापर्यंत.

पश्चिम : उमरेड रोडवरील शितला माता मंदीर चौकापासून उत्तरेकडे व नंतर ईशान्य दिशेकडे जाणाऱ्या मिडल रिंगरोडने | हसनबाग चौकापर्यंत पुढे त्याच रोडने श्री. कृष्णनगर चौकापर्यंत पुढे त्याच रोडने नागपूर सुधार प्रन्यासचे कॉम्प्लेक्स जवळील मिडल रिंग रोडवरील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोलपंपापर्यंत.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

Non Stop LIVE Update
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब.
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय.
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत...
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत....
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्..
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्...
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला.
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी.
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप.
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका.
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.