NMMC Election 2022 : राजकीय उलथापालथीनंतर नवी मुंबई प्रभाग 24मध्ये काँग्रेस मिळवणार विजय?

| Updated on: Aug 06, 2022 | 4:56 PM

नवी मुंबई महापालिकेत यंदा कोण विजय मिळवणार याविषयी अधिक उत्सुकता आहे. कारण मागील सात वर्षात याठिकाणी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. पक्षबदल हा मोठा मुद्दा आहे. तर नुकताच होणार शिवसेना आणि शिंदे गटातील वाद यासर्व बाबी निकालावर परिणाम करणार आहेत.

NMMC Election 2022 : राजकीय उलथापालथीनंतर नवी मुंबई प्रभाग 24मध्ये काँग्रेस मिळवणार विजय?
नवी मुंबई महापालिका, वॉर्ड 24
Image Credit source: tv9
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेची यंदाची निवडणूक (NMMC Election 2022) वेगळी असणार आहे. या महापालिकेत पहिल्यांदाच तीन सदस्यीन नगरसेवक पद्धतीने निवडणूक होणार आहे. आधी येथील निवडणूक सलग सहावेळा वॉर्ड पद्धतीनेच झाली होती. एक वॉर्ड एक नगरसेवक (Corporator) अशा पद्धतीची ही निवडणूक होती. यावेळी मात्र सर्वच बदलले. म्हणजे प्रशासकीय दृष्ट्याही बदल झाला तर राजकीय उलथापालथही नवी मुंबईत झाली. अनेकांनी पक्षबदल केले. त्यामुळे यावेळी वेगळा निकाल लागणार असल्याचे बोलले जात आहे. येथील प्रभाग 24मध्ये काँग्रेसचे (Congress) वर्चस्व पाहायला मिळाले होते. मात्र त्यावेळी एक प्रभाग, एक नगरसेवक असे गणित होते. यावेळी 3 नगरसेवक असणार आहेत. आरक्षणही बदलले असल्यामुळे इच्छुक आपल्यासाठी योग्य असा प्रभाग निवडत असल्याचे दिसत आहे.

प्रभागातील व्याप्ती कशी?

प्रभाग 24ची तुर्भे स्टोअर (भाग), हनुमान नगर तुर्भे, एमआयडीसी क्षेत्र, आंबेडकर नगर, गणेश नगर, इंदिरा नगर आणि इतर अशी व्याप्ती आहे. तर मातोश्री मेडिकल, बीएसएफ कंपनी, डंपिंग ग्राऊंड, बगाडे कंपनी, महापालिकेच्या डोंगराकडील पूर्व हद्द, इंदिरानगर आदी महत्त्वाची ठिकाणे येतात.

लोकसंख्येचे गणित

प्रभाग क्रमांक 24मधील एकूण लोकसंख्या 30,406 इतकी आहे. यात अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या 6134 इतकी असून अनुसूचित जमाचीची लोकसंख्या 637 एवढी आहे.

हे सुद्धा वाचा

कोण मारणार बाजी?

नवी मुंबई महापालिकेत यंदा कोण विजय मिळवणार याविषयी अधिक उत्सुकता आहे. कारण मागील सात वर्षात याठिकाणी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. पक्षबदल हा मोठा मुद्दा आहे. तर नुकताच होणार शिवसेना आणि शिंदे गटातील वाद यासर्व बाबी निकालावर परिणाम करणार आहेत.

विजयी उमेदवार (2015)

मंदाकिनी रमाकांत म्हात्रे (काँग्रेस)

प्रभाग 24 (A)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग 24 (B)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग 24 (C)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

आरक्षण कसे?

प्रभाग 24चे आरक्षण यंदा वेगळे असणार आहे. मागील वेळी असणाऱ्या आरक्षणात बदल करण्यात आला आहे. तीन सदस्यीय वॉर्डरचना असणार आहे. त्यानुसार 24 अ हा अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारासाठी राखीव असणार आहे. ब हा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी तर क हा सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.