योगींच्या दौऱ्यावरून राजकारण तापलं, बॉलिवूड शिफ्ट होणार?; संजय निरुपम म्हणतात…

| Updated on: Dec 02, 2020 | 1:52 PM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. (No one can forcibly take away bollywood from Maharashtra says sanjay nirupam)

योगींच्या दौऱ्यावरून राजकारण तापलं, बॉलिवूड शिफ्ट होणार?; संजय निरुपम म्हणतात...
Follow us on

मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. मनसेची पोस्टरबाजी आणि शिवसेनेकडून टीका होत असतानाच आता त्यात काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उडी घेतली असून त्यांनी बॉलिवूडच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपला सुनावले आहे. (No one can forcibly take away bollywood from Maharashtra says sanjay nirupam)

संजय निरुपम यांनी ट्विट करून बॉलिवूड शिफ्ट होण्याच्या मुद्द्यावरून राडा करणाऱ्या दोन्ही पक्षांना झापले आहे. बॉलिवूडला कोणीच कुठे घेऊन जाऊ शकत नाही आणि बॉलिवूडला कोणत्याही राजकीय पक्षाच्या संरक्षणाची गरजही नाही. सिनेमावेड्या लोकांनी आपल्या कष्ट आणि मेहनतीतून बॉलिवूडचं विराट विश्व निर्माण केलं आहे. ही अंतर्गत प्रक्रिया सुमारे वीस वर्ष सुरू आहे. त्यामुळे नेत्यांनी बॉलिवूड शिफ्ट करण्याच्या किंवा बॉलिवूडला वाचवण्याच्या वल्गना करू नये, अशा शब्दांत निरुपम यांनी शिवसेना आणि भाजपला सुनावले आहे.

उत्तर प्रदेशात फिल्मसिटी निर्माण करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी ते दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी अभिनेता अक्षयकुमार याच्याशी चर्चा करून फिल्मसिटी उभारणीची माहिती घेतली आहे. आजही काही कलाकारांना भेटून ते नव्या फिल्मसिटीबाबत चर्चा करणार आहेत. योगी आदित्यनाथ यांनी फिल्मसिटीच्या उभारणीसाठी मुंबईत ठाण मांडलेलं असतानाच शिवसेना आणि मनसेने मात्र त्यांच्या या दौऱ्याला विरोध केला आहे. मनसेने पोस्टरबाजी करत योगींना ठग म्हटलं आहे. तर शिवसेनेने योगींनी फक्त मुंबईशीच पंगा घेतलाय का? असा सवाल केला आहे.

योगी आदित्यनाथ हे साधू आहेत. महाराज आहेत. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानिमित्ताने ते काही कलाकारांना भेटले. अक्षयकुमारलाही भेटले. अक्षयकुमार कदाचित त्यांना आंब्याच्या पेट्या घेऊन गेला असेल, अशी कोपरखळी लगावतानाच मुंबईतील फिल्मसिटी एका रात्रीत उभी राहिलेली नाही. अनेक वर्षाची मेहनत आणि कष्ट त्यामागे आहेत. योगी मुंबईत आले. तसे तामिळनाडूतही जाणार आहेत का? तिकडेही मोठी फिल्मसिटी आहे. की फक्त योगींनी मुंबईशीच पंगा घेतलाय?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

 

संबंधित बातम्या:

उद्योगांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही; योगींच्या दौऱ्याची भाजपकडून पाठराखण

योगी आदित्यनाथ यांनी फक्त मुंबईशीच पंगा घेतलाय का?; संजय राऊतांचा सवाल

उत्तर प्रदेशातील फिल्मसिटी देशाची नवी ओळख, मुंबईत योगी सरकारची जाहिरातबाजी

मुंबईत दाखल होताच योगी आदित्यनाथ यांची अक्षय कुमारसोबत बैठक, उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी उभारण्याबाबत चर्चा_

(No one can forcibly take away bollywood from Maharashtra says sanjay nirupam)