विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार जाहीर

| Updated on: Nov 19, 2020 | 10:22 PM

महाविकास आघाडीच्या नेत्यांना भरघोस मतांनी विजयी करा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे (Official candidate announced by Mahavikas front for Graduate and Teacher Constituency of Legislative Council).

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार जाहीर
Follow us on

मुंबई : राज्यातल्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांची निवडणूक येत्या 1 डिसेंबर रोजी होणार आहे. औरंगाबाद, पुणे, नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघाची तर अमरावती आणि पुणे विभागाच्या शिक्षक मतदारसंघांची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्तपणे प्रसिद्धपत्रक जारी करत महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर केले आहेत (Official candidate announced by Mahavikas front for Graduate and Teacher Constituency of Legislative Council).

या प्रसिद्धीपत्रकात महाविकास आघाडीच्या नेत्यांना भरघोस मतांनी विजयी करा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे (Official candidate announced by Mahavikas front for Graduate and Teacher Constituency of Legislative Council).

महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची यादी :

1) अमरावती शिक्षक मतदारसंघ – श्रीकांत देशपांडे (शिवसेना)
2) पुणे शिक्षक मतदारसंघ – जयंत आसगांवकर (काँग्रेस)
3) पुणे पदवीधर मतदारसंघ – अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस)
4) औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ – सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस)
5) नागपूर पदवीधर मतदारसंघ – अभिजित वंजारी (काँग्रेस)

अशी रंगणार लढत

  • नागपूर पदवीधर मतदारसंघातील लढत

अभिजित वंजारी (काँग्रेस) vs संदीप जोशी (भाजप) vs राहुल वानखेडे (वंचित) vs नितीन रोंघे (विदर्भवादी उमेदवार)

  • औरंगाबादमध्ये पदवीधर मतदारसंघातील लढत

शिरीष बोराळकर (भाजप) vs प्रवीण घुगे (भाजप बंडखोर) vs रमेश पोकळे (भाजप बंडखोर) vs नागोराव पांचाळ (वंचित) vs सतीश चव्हाण (राष्ट्रवादी) vs ईश्वर मुंडे (राष्ट्रवादी)

  • अमरावती शिक्षक पदवीधर मतदारसंघाली लढत

श्रीकांत देशपांडे (शिवसेना) vs नितीन धांडे vs दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती) vs संगीता शिंदे शिक्षण संघर्ष समिती कडून (भाजपा माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांची बहीण ) vs प्रकाश काळबांडे ( विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ )

  • पुणे शिक्षक मतदारसंघातील लढत

जयंत आसगावकर (काँग्रेस) vs उत्तम पवार (पदवीधर कल्याण मंडळ)

 

संबंधित बातमी : पुणे पदवीधर स्पेशल रिपोर्ट : दोन ‘पाटील’ प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला, मनसेमुळे तिरंगी लढत