AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omraje Nimbalkar: ओमराजे गद्दारी करू नका… सोशल मीडियावरून नेटकऱ्यांची हाक; व्हिडिओही शेअर

Omraje Nimbalkar: धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. नेटकऱ्यांनी 'गद्दारी करू नका' अशी हाक दिली आहे, तर गावकऱ्यांनी राजीनामा देऊन निवडून येण्याचे आवाहन केले आहे. मंत्रिपद आणि वडिलांच्या खटल्याचा निकाल बाजूने लावण्याचे आमिष दाखवून दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Omraje Nimbalkar: ओमराजे गद्दारी करू नका... सोशल मीडियावरून नेटकऱ्यांची हाक; व्हिडिओही शेअर
Omraje NimbalkarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 17, 2026 | 12:55 PM
Share

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. विशेष म्हणजे ओमराजेंना बंडखोरी करण्याच्या बदल्यात मंत्रिपद मिळणार आहे. शिवाय त्यांच्या वडिलांच्या हत्येचा निकाल त्यांच्या बाजूने लावण्याचं अमिषही देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियातही या बंडाचे पडसाद उमटले आहेत. या बंडावर सोशल मीडियातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. ओमराजे गद्दारी करू नका, अशा कमेंट नेटकरी करत आहेत. त्यामुळे ओमराजे निंबाळकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करणार वीडियो पोस्ट केला होता. त्यावर नेटकऱ्यांनी ओमराजे, गद्दारी करू नका, दादा गद्दारी करू नका… अशा कमेंटसचा पाऊस पाडला आहे. ओमराजेंचा व्हिडिओ येताच अवघ्या काही मिनिटातच या कमेंटचा पाऊस सुरू झाला आहे. निष्ठावंत म्हणून ओमराजे निंबाळकर धाराशिव लोकसभेत राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आले आहेत. मात्र आता ऑपरेशन टायगरमध्ये ओमराजे यांच्या नावाची चर्चा आहे. त्या अनुषंगाने ओमराजे निंबाळकर यांचे नाव चर्चेत आले आहे.

आधी राजीनामा द्या, मगच…

तर, ओमराजे पक्षातून फुटणार म्हटल्यावर ग्रामस्थांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील ग्रामस्थांनी या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ओमराजे निंबाळकर यांनी अधिक खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर निवडून येऊन दुसऱ्या पक्षात जावे, असा संताप गावकरी व्यक्त करत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातून या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ओमराजे निंबाळकर यांच्या पडत्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांना मोठ सहकार्य केलं. आमदार केलं. खासदार केलं आणि आता ओमराजे वेगळे होत आहेत. त्यांचा निर्णय चुकीचा आहे, असं या गावकऱ्यांनी म्हटलं आहे.

राऊतांचा दावा काय?

दरम्यान, ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याबाबतच्या चर्चा सुरू असताना ओमराजेंकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांनी आज सकाळी एक ट्विट केलं होतं. पण ते राजकीय नव्हतं. त्यामुळे ओमराजे नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, दुसरीकडे ओमराजे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सूचक भाष्य केलं आहे. ओमराजेंचे वडील पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या ड्रायव्हरची 20 वर्षापूर्वी हत्या झाली होती. त्याचा निकाल काल होता. तो निकाल पुढे ढकलला आहे. वडिलांच्या हत्येचा निकाल बाजूने लावण्यासाठी ओमराजेंवर दबाव आणला गेला आहे, असं सूचक विधान राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं