AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गेल्या 56 वर्षात अनेक आघात झाले, त्यांना गाडून शिवसेना पुढे गेली; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला अप्रत्यक्ष टोला

उरणमधून मशाल घेऊन मातोश्रीवर दाखल झालेल्या कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटाला अप्रत्यक्ष टोला लगावला.

गेल्या 56 वर्षात अनेक आघात झाले, त्यांना गाडून शिवसेना पुढे गेली; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला अप्रत्यक्ष टोला
| Updated on: Oct 12, 2022 | 3:53 PM
Share

मुंबई :  उरणमधून मशाल घेऊन मातोश्रीवर दाखल झालेल्या कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटाला अप्रत्यक्ष टोला लगावला. मी शिवतीर्थावर जे बोललो तेच आज मी इथेही बोलत आहे. ही माझी भावना आहे. शिवसेना (Shiv Sena) 56 वर्षांची झाली आहे. या  56 वर्षांमध्ये शिवसेनेने  असे 56 जण पाहिले. मात्र ज्यांनी ज्यांनी शिवसेनेवर आघात करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यामुळे शिवसेना संपली नाही तर त्यांना गाडून शिवसेना पुढे गेली आहे. शिवसेना अधिक जोमाने उभी राहिली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

उरणमधून शिवसेनेचं नवं चिन्ह असलेली मशाल घेऊन शेकडो कार्यकर्ते आज मातोश्रीवर दाखल झाले. या कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. शिवसेना 56 वर्षांची झाली आहे. या काळात शिवसेनेने असे 56 जण पाहिले. ज्यांनी -ज्यांनी शिवसेनेवर आघात करण्याचा प्रयत्न केला, त्यांना गाडून शिवसेना पुढे गेली. शिवसेनेने अधिक जोमाने भरारी घेतली असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मशाल चिन्हावर समता पार्टीचा दावा

दरम्यान नवं चिन्ह मिळाल्यानंतर देखील ठाकरे गटाच्या अडचणी अद्यापही कमी झालेल्या नाहीत. ठाकरे गटाला मिळालेलं नवं चिन्ह मशालवर बिहारमधील समता पार्टीने अक्षेप घेतला आहे. हे चिन्ह आमचं असल्याचा दावा करण्यात आला आहे. एवढचं नव्हे तर समता पार्टीचा कार्यकर्ता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे पत्र घेऊन निवडणूक आयोगाकडे पोहोचला देखील आहे. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
अमरावती रुग्णालय आग प्रकरण; चौकशी प्रमुखांवर सुषमा अंधारेंचा संताप
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
"बॅनर A-1, पण रस्ता स्पेस टेक्नॉलॉजीचा"; ठाकरेंचा भरत गोगावलेंन टोला
आदित्य ठाकरेंचा सवाल:
सुटे तेल बंदीवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
सुटे तेल बंदी: आठवडी बाजारांना फटका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना