PUNE : 13 डिसेंबरला विरोधकांची पुणे बंदची हाक, हे पक्ष होणार सहभागी

17 डिसेंबरला मुंबई महामोर्चाची घोषणा केल्यानंतर आता 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक देण्यात आली आहे.

PUNE : 13 डिसेंबरला विरोधकांची पुणे बंदची हाक, हे पक्ष होणार सहभागी
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 5:19 PM

पुणे : विरोधकांनी 13 डिसेंबरला पुणे बंदची (Pune Band) हाक दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आणि ठाकरे गट देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहे. राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवा आणि भाजपनं महाराष्ट्राची माफी मागावी या मागणीसाठी या बंदची हाक देण्यात आली आहे. ( Opposuiton parties call for Pune bandh on December 13 )

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटही या बंदमध्ये सहभागी होत आहे. छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांना देखील बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे ते काय भूमिका घेतात याकडे ही लक्ष असणार आहे.

महाविकासआघाडीने याआधीच १७ डिसेंबरला मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं आहे. विरोधक सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. राणीची बाग ते आझाद मैदान असा हा मोर्चा असणार आहे. महाविकासआघाडीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. सगळ्या पुणेकरांना देखील पुणे बंद मध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय.

राज्यपालांना हटवण्याची मागणी महाविकासआघाडीने केली आहे. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात हा मोर्चा असणार आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

राज्यपाल आणि शिंदे सरकारला विरोधकांकडून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी विरोधक आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. त्यामुळे १९ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात देखील विरोधकांची आक्रमक भूमिका दिसण्याची चिन्ह आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राज्यपाल आणि सरकार अडचणीत सापडलं आहे. सोबतच बेळगाव सीमा प्रश्नावरुन देखील विरोधकांचा सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न असणार आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.