Sharad Pawar : उद्धव ठाकरे सरकार चालवू शकतात हे तेव्हाच स्पष्ट होईल; शरद पवार यांचं मोठं विधान

Sharad Pawar : शरद पवार यांनी दिल्लीत येण्याचं कारणही स्पष्ट केलं आहे. मी दिल्लीत आलोय. पण मी कुणालाही भेटणार नाही. दिल्लीत आमची संसदेची एक मिटिंग आहे. विरोधकांचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार अर्ज भरणार आहे.

Sharad Pawar : उद्धव ठाकरे सरकार चालवू शकतात हे तेव्हाच स्पष्ट होईल; शरद पवार यांचं मोठं विधान
उद्धव ठाकरे सरकार चालवू शकतात हे तेव्हाच स्पष्ट होईल; शरद पवार यांचं मोठं विधान
Image Credit source: tv9 marathi
भीमराव गवळी

|

Jun 26, 2022 | 5:36 PM

नवी दिल्ली: राज्यात अनेक बड्या राजकीय घडामोडी घडत असतानाच राष्ट्रवादीचे (ncp) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar ) आज दिल्लीत आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. आमच्या पार्टीचा उद्धव ठकारेंना (cm uddhav thackeray) पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यांचे काही आमदार आसामला गेले आहेत. ते परत येतील. या आमदारांना भेटण्याची संधी मिळेल तेव्हा उद्धव ठाकरे सरकार चालवू शकतात हे स्पष्ट होईल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पवारांच्या या विधानावर अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. पवारांना सरकार राहील की नाही याबाबत साशंकता असल्याचं त्यांच्या विधानातून स्पष्ट होत आहे. तसेच आमदार पुन्हा माघारी परतण्याच्या मूडमध्ये नसल्याचंही त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे राज्यात नेमकं काय होणार? याबाबतचं गूढ अधिकच वाढलं आहे.

शरद पवार यांनी दिल्लीत येण्याचं कारणही स्पष्ट केलं आहे. मी दिल्लीत आलोय. पण मी कुणालाही भेटणार नाही. दिल्लीत आमची संसदेची एक मिटिंग आहे. विरोधकांचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार अर्ज भरणार आहे. यशवंत सिन्हा हे आमचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. त्यासाठी मी इथे आलोय. इतर विरोधी पक्षाचे नेतेही येतील. अखिलेश यादव दुसऱ्या फ्लाईटने येत असल्याचं समजलं. उद्या 11.30 वाजता अर्ज सादर केला जाणार आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.

पवारांच्या जोरबैठका

दरम्यान, राज्यात राजकीय संकट ओढवलं आहे. एकनाथ शिंदे गटाने बंड केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. तसेच सरकारही अल्पमतात आलं आहे. गेल्या सहा दिवसांपासून या आमदारांचं बंड कायम आहे. बंडखोर ऐकायला तयार नसल्याने शिवसेनेपुढे संकट निर्माण झालं आहे. अशावेळी शिवसेनेतील बंड थोपवण्यासाठी शरद पवार सक्रिय झाले आहेत. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत तीन वेळा बैठक घेतली. त्यानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत सिल्व्हर ओकवर चर्चा केली. यावेळी पवारांनी कायदेशीर आणि संसदीय डावपेच आणि सल्ले दिल्याचं सांगितलं जातं. कोर्टात गेल्यावर कोणते युक्तिवाद केले पाहिजे, कोर्टात कुठला वकील असला पाहिजे यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. या बैठकीनंतर पवार दिल्लीकडे रवाना झाले.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादी शिवसेनेसोबतच

कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेची साथ सोडायची नाही. अशा संकटाच्या वेळी तर बिलकूल साथ सोडायची नाही, असे आदेशच शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. पवारांच्या या आदेशातून भाजप सोबत कोणताही घरोबा करायचं नाही असं स्पष्ट होत असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें