
पाच वर्षांपूर्वी पालघरमध्ये दोन साधुंची हत्या झाली होती. जमावाने मिळून ही हत्या केली होती. या प्रकरणात भाजपने ज्या नेत्यावर आरोप केले होते, त्यालाच आता पक्षात प्रवेश दिला. यावरुन विरोधी पक्षांनी कोंडीत पकडल्यानंतर भाजपने त्यांच्या पक्ष प्रवेशाला स्थगिती दिली. या प्रकरणात भाजपने त्यावेळी काशिनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले होते. त्या काशिनाथ चौधरींना पक्षात प्रवेश देऊन भाजपने आता यू-टर्न मारला आहे. काशिनाथ चौधरी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. “दोन दिवसांपूर्वी माझा भाजपा पक्षप्रवेश झाला. पण पाच वर्षापूर्वी साधू हत्याकांडाशी माझा संबंध जोडला गेला. या प्रकरणात मी साक्षीदार आहे. सरकारने मला सरकारने संरक्षण दिले आहे. या प्रकरणात माझी प्रतिमा मलिन झाली आहे. कालपासून माझं कुटुंब मानसिक तणावाखाली आहे. ते रडतायत. मी फक्त मदत करायला गेलो होतो. माझा मुलगा व्याकुळ आहे” असं काशिनाथ चौधरी म्हणाले.
“माझ्या कुटुंबाला त्रास होतोय. माझी मुलं रडतायत. या राजकारणासाठी माझी राजकीय कारकीर्द संपवायला निघालेत” असं काशिनाथ चौधरी म्हणाले. या प्रकरणात पोलिसांच्या विनंतीवरुन मी वाचवायला गेलो होतो, असं ते म्हणाले. “दोन दिवसांपूर्वी माझा भाजपा पक्ष प्रवेश झाला होता. या पक्षप्रवेशानंतर पाच वर्षापूर्वी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांडाशी माझा संबंध जोडण्यात आला. या सर्व प्रकरणात मी फक्त साक्षीदार आहे .सरकारने मला संरक्षण सुद्धा दिले आहे” असं काशिनाथ चौधरी यांनी सांगितलं.
राजकारणामुळे माझं कुटुंब भरडलं जातय
“या प्रकरणाशी माझा काहीही संबध नाही. त्याठिकाणी पोलिसांच्या सांगण्यावरून मी फक्त मदत करण्यासाठी गेलो होतो. या प्रकरणात माझी प्रतिमा मलिन केली जात आहे. काल पासून मी आणि माझं कुटुंब प्रचंड मानसिक तणावात आहे. मी फक्त मदत करायला गेलो होतो. या प्रकरणाशी माझा संबध जोडून वारंवार मला प्रसार माध्यमांमध्ये दाखवलं जात आहे. त्यामुळे माझी मुलगी, मुलगा खूप तणावात आहेत. राजकारणामुळे माझं कुटुंब भरडलं जात आहे” असं काशिनाथ चौधरी म्हणाले.
भाजपत प्रवेश कसा झाला?
“जिल्ह्यातील भाजपाच्या स्थानिक पुढाऱ्यांसोबत चर्चा होऊन माझा भाजपा पक्ष प्रवेश झाला होता. यावेळी कोणतेही आश्वासन दिले नव्हते. मी एक फक्त कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. गडचिंचले प्रकरणात माझ्या सर्व चौकश्या झाल्या आहेत. मी कुठेही आरोपी नाही तर या घटनेचा साक्षीदार आहे” असा दावा त्यांनी केला.