AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ताई आता हा चेहरा शिवसेनेतच शोभून दिसेल, पंकजा मुंडेंनी प्रोफाईल फोटो बदलला, कार्यकर्त्यांच्या भन्नाट कमेंट, डावलण्यावर मात्र मौन कायम!

विधान परिषदेच्या उमेदवारीची संधी नाकारल्यामुळे नाराज पंकजा मुंडे पक्ष बदलणार की शिवसेनेत जाणार, अशा चर्चांना उधाण आलंय. एकिकडे मुंडे परिवाराचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं स्थान सांगून पंकजा मुंडेंवर अन्याय झाल्याचं वारंवार बोलून दाखवत आहेत. तर काही शिवसेना नेत्यांनी पंकजा ताई शिवसेनेत आल्या तर आम्हाला आनंद होईल, असं वक्तव्य केलं.

ताई आता हा चेहरा शिवसेनेतच शोभून दिसेल, पंकजा मुंडेंनी प्रोफाईल फोटो बदलला, कार्यकर्त्यांच्या भन्नाट कमेंट, डावलण्यावर मात्र मौन कायम!
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 17, 2022 | 11:12 AM
Share

औरंगाबादः विधान परिषदेची (MLC Election) संधी नाकारण्यात आल्यानंतर मौनात गेलेल्या पंकजा मुंडे यांनी आज एक सूचक कृती केलीय. भाजपात वारंवार डावलल्या गेलेल्या पंकजा ताईंनी आता काहीतरी ठोस निर्णय घ्यायलाच पाहिजे, अशी अपेक्षा सर्व पक्षीय नेते तसेच कार्यकर्त्यांना आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा ताईंनी (Pankaja Munde) त्यांच्या ट्विटर हँडलचा प्रोफाइल फोटो बदलला. नव्या दमाचा, फ्रेश आणि अत्यंत आत्मविश्वास पूर्ण असा हा फोटो पाहून त्यांचे चाहते आणि कार्यकर्त्यांमध्येही (Pankaja Supporters) उत्साह संचारला आहे. हा फोटो पाहून कार्यकर्त्यांच्या एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स येत आहेत. आता संघर्ष अटळ आहे, लोकनेत्या, ताईसाहेब…, रणरागिणी अशा अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच ताई, आता हा चेहरा शिवसेनेतच शोभून दिसेल… अशीही कमेंट दिली आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विटरचा बदललेला हा फोटो आज मराठवाड्यातील सोशल मीडियात प्रचंड चर्चेत आहे.

हे तेज, आत्मविश्वास, काय सांगतोय फोटो?

पंकजा मुंडे यांनी आज ट्वीट केलेल्या फोटोतून काहीतरी सूचक संकेत मिळतायत, अशी चर्चा आहे. आपण नाराज असूनही प्रचंड आत्मविश्वासाने पुन्हा एकदा युद्धासाठी तयार आहोत, असा अर्थ त्यातून सुचवायचा आहे. की एखाद्या नव्या मोहिमेसाठी आपण सज्ज आहोत, असं त्यातून सांगायचंय… असे असंख्य तर्कवितर्क लावले जात आहे.

मौनातून अस्वस्थता बोलतेय?

विधान परिषदेची उमेदवारी मिळाली तर संधीचं सोनं करीन असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिना निमित्तच्या कार्यक्रमात केलं. भाजप नेतृत्वाकडून ही संधी दिली जाईल, अशी अपेक्षा पंकजा मुंडेंना होती. भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली. त्यात पंकजा मुंडेंना डावलण्यात आलं. त्यानंतर मात्र पंकजा मुंडेंची एकही प्रतिक्रिया आली नाही. बोलतायत ते त्यांचे कार्यकर्ते. मराठवाड्यातील अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांची अस्वस्थता दर्शवली. देवेंद्र फडणवीस बोलले, चंद्रकांत पाटील बोलले, पण पंकजा मुंडेंचं मात्र यावर मौन आहे. या मौनातूनच त्यांनी अस्वस्थता बोलतेय की काय, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

नाराज पंकजांना विविध ऑफर

विधान परिषदेच्या उमेदवारीची संधी नाकारल्यामुळे नाराज पंकजा मुंडे पक्ष बदलणार की शिवसेनेत जाणार, अशा चर्चांना उधाण आलंय. एकिकडे मुंडे परिवाराचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं स्थान सांगून पंकजा मुंडेंवर अन्याय झाल्याचं वारंवार बोलून दाखवत आहेत. तर काही शिवसेना नेत्यांनी पंकजा ताई शिवसेनेत आल्या तर आम्हाला आनंद होईल, असं वक्तव्य केलं. दुसरीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही त्यांना वारंवार लाचारी पत्करण्यापेक्षा स्वतंत्र पक्ष काढावा, असा प्रस्ताव दिलाय. कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे, इतर पक्षांकडूनही सहानुभूती, ऑफर मिळतायत, पण पंकजा मुंडे यांनी अद्याप यावर एका शब्दाचीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आजच्या ट्वीटमधून त्या काहीतरी सूचवत आहेत, हे नक्की…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.