AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLC Election | विधान परिषदेच्या आखाड्यात हायप्रोफाइल ड्रामा, पवईच्या हॉटेलमध्ये आमदार आजपासून लॉक, अनोळखी व्यक्तीला परवानगी नाही!

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआ आणि भाजपकडून अंतर्गत बातम्या फुटू नये, यासाठी जेवढी जास्त खबरदारी घेतली जात आहे, तेवढंच अफवा आणि चर्चांचं पिक वाढलंय.

MLC Election | विधान परिषदेच्या आखाड्यात हायप्रोफाइल ड्रामा, पवईच्या हॉटेलमध्ये आमदार आजपासून लॉक, अनोळखी व्यक्तीला परवानगी नाही!
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9 marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jun 17, 2022 | 9:46 AM
Share

मुंबईः विधान परिषद निवडणुकीच्या (MLC Election) पार्श्वभूमीवर मुंबईत उच्च स्तरावर नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शिवसैनिक आमदारांना तसेच महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सेना समर्थित आमदारांना पवई येथील हॉटेलमध्ये बोलावण्यात आलं आहे. कालपासूनच यासंबंधीच्या सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत. आज दुपारी 1 वाजेनंतर पवईच्या रेन्सॉ हॉटेलमध्ये राज्यभरातून आमदार दाखल होण्यास सुरुवात होईल. विधान परिषद निवडणुकीसाठी एकेका आमदाराचं मत कोट्यवधी रुपयांच्या मोलांचं आहे. त्यामुळे एकही आमदार फुटू नये, यासाठी ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारकडून काळजी घेतली जात आहे. ऐनवेळी दगाफटका होऊ नये, यासाठी आमदारांना दोन दिवस आधीपासूनच पवईच्या हॉटेलमध्ये मुक्कामी बोलावण्यात आलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवेळीही मविआतर्फे आमदारांना एका हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्यात आलं होतं. मतदान कसं करायचं, याच्या तंतोतंत सूचना दिल्या होत्या. तरीही ऐनवेळी शिवसेनेच्या उमेदवाराला हार पत्करावी लागली. आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मविआतर्फे अधिक खबरदारी घेतली जात आहे.

अनोळखी व्यक्तीला प्रवेश नाही

पवई येथील ज्या रेन्सॉ हॉटेलमध्ये शिवसेनेचे आमदार तसेच सेना समर्थित अपक्ष आमदारांना दुपारनंतर दाखल होण्याचे आदेश दिले आहेत. या हॉटेल परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. हॉटेल रेन्सॉ परिसराला आता जणू छावणीचंच रुप आलं आहे. हॉटेलमधली कोणतीही बातमी फुटू नये, यासाठी हॉटेल प्रशासनालाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीला हॉटेलमध्ये प्रवेश न देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मविआमध्ये राष्ट्रवादीकडून फोडाफोडी?

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआ आणि भाजपकडून अंतर्गत बातम्या फुटू नये, यासाठी जेवढी जास्त खबरदारी घेतली जात आहे, तेवढंच अफवा आणि चर्चांचं पिक वाढलंय. यातच एक बातमी पुढे आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना समर्थित अपक्ष आमदाराला फोन आल्याची माहिती आहे. एका मतासाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याकडून हा फोन आल्याचं बोललं जात आहे. यंदा विधानपरिषदेतील निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अतिरिक्त मतांची गरज आहे. त्यामुळे शिवसेना समर्थित अपक्ष आमदारांवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डोळा आहे. राष्ट्रवादीकडून असा फोन गेल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Follow Us
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं...
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप