मी माझ्या शत्रूलाही कधी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची वेळ आणली नाही : पंकजा मुंडे

| Updated on: Oct 22, 2020 | 11:07 PM

मी आतापर्यंत राजकारणात आहे, मात्र मी माझ्या शत्रूलाही कधी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची वेळ आणली नाही, असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं.

मी माझ्या शत्रूलाही कधी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची वेळ आणली नाही : पंकजा मुंडे
Follow us on

बीड : माजी मंत्री आणि भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. त्यानी देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजकीय सूड उगवत छळ केल्याचाही आरोप केला. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या राजकीय विरोधकांना नाव न घेता टोला लगावला आहे. मी आतापर्यंत राजकारणात आहे, मात्र मी माझ्या शत्रूलाही कधी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची वेळ आणली नाही, असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. त्यांनी अप्रत्यक्षपणे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधल्याचीही चर्चा आहे (Pankaja Munde comment on her Politics and Political rivalry in Beed).

पंकजा मुंडे म्हणाल्या, “तुम्ही मला बीडसाठी 5 वर्ष झटताना पाहिलं आहे. या 5 वर्षात निधी असेल किंवा इतर गोष्टीत कधीही राजकारण केलं नाही. माझ्या शत्रूलाही पोलीस स्टेशनला जायची वेळ आणली नाही. मी कधीही शत्रूच्या कार्यकर्त्यांवर त्यांच्या संस्थांवर, संस्थाचालकांवर किंवा त्या संस्थांच्या अध्यक्षांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना ट्रॅप करण्याचे प्रयत्न केले नाहीत. बीड जिल्ह्यात अगदी शत्रूच्याही माध्यमातून 4 रोजगार निर्माण होत असतील तर त्यांना ताकदच देण्याचा प्रयत्न केला. ”

दरम्यान, आज (22 ऑक्टोबर) पंकजा मुंडे यांचं बीडमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. पंकजा मुंडे तब्बल 8 महिन्यांनंतर बीड जिल्ह्यात परतल्या. याच गोष्टीच्या आनंदात कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, बँड वाजवत, फटाके फोडून मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं.

भाजप कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांचं जालना-बीड सीमेवर जंगी स्वागत केलं. यावेळी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे फिजीकल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाला. याशिवाय मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. याचंदेखील भान कार्यकर्त्यांना राहिलं नसल्याचं पाहायला मिळालं.

सावरगावचा दसरा मेळावा होणारच : पंकजा

दरम्यान, बीड जिल्ह्यात सावरगाव येथे दरवर्षी होणारा दसरा मेळावा होणारच. पण यावर्षी हा मेळावा ऑनलाईन पद्धतीने होईल, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. सर्वांनी घरामधूनच दर्शन घ्यावं, असं आवाहन पंकजा यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या :

ऊसतोड कामगारांच्या मेळाव्याला नेतेच जास्त येऊ नये; पंकजा मुंडेंचा आंबेडकरांना टोला

पंकजा मुंडे आठ महिन्यांनी बीडला, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत

PHOTO : आधी पंकजा मुंडेंचं बीडमध्ये जंगी स्वागत, नंतर नुकसानग्रस्त भागाची पाहणी

संबंधित व्हिडीओ :

Pankaja Munde comment on her Politics and Political rivalry in Beed