ऊसतोड कामगारांच्या मेळाव्याला नेतेच जास्त येऊ नये; पंकजा मुंडेंचा आंबेडकरांना टोला

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दसऱ्याच्या दिवशी भगवान गडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगारांचा मेळावा घेण्याचं जाहीर केलं आहे. त्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे.

ऊसतोड कामगारांच्या मेळाव्याला नेतेच जास्त येऊ नये; पंकजा मुंडेंचा आंबेडकरांना टोला

बीड: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दसऱ्याच्या दिवशी भगवान गडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगारांचा मेळावा घेण्याचं जाहीर केलं आहे. त्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे. मेळावा जरूर घ्या. पण या मेळाव्याला ऊसतोड कामगरांपेक्षा नेतेच जास्त येऊ नये, असा टोला पंकजा मुंडे यांनी आंबेडकरांना लगावला आहे. (bjp leader pankaja munde criticized prakash ambedkar)

तब्बल आठ महिन्यानंतर पंकजा मुंडे आज बीडला आल्या. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेली मीडियाशी संवाद साधताना त्यांनी आंबेडकरांना हा टोला लगावला. मला प्रकाश आंबेडकरांबद्दल प्रचंड आदर आहे. त्यांनी भगवान गडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगारांचा मेळावा आयोजित केला आहे. त्याचं स्वागतच आहे. मात्र, या मेळाव्याला कामगारांपेक्षा नेतेच जास्त येऊ नये, असा टोला पंकजा मुंडे यांनी लगावाल आहे.

दरम्यान, दसऱ्याच्या दिवशी ऊसतोड कामगारांचा मेळावा भगवान गडाच्या पायथ्याशी घेणार असल्याचं वंचितनं जाहीर केलं आहे. ऊसतोड कामगारांचा मेळावा आयोजित करून एक प्रकारे आंबेडकरांनी पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासमोर नवं आव्हानच उभं केल्याचं बोललं जातं. ऊसतोड कामगार ही पंकजा आणि धनंजय मुंडे यांची खरी व्होटबँक आहे. आता त्यालाच आंबेडकर यांनी सुरुंग लावायला निघाले असल्याचीही चर्चा आहे. यापूर्वी आंबेडकरांनी धनगर समाजाला आपल्याकडे आकर्षिक केले होते. त्याचा फटका सोलापूरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना बसला होता. धनगर मतांमध्ये फूट पडल्याने सुशीलकुमार यांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. त्यामुळे आंबेडकर बीडमध्ये त्याचीच पुनरावृत्ती करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (bjp leader pankaja munde criticized prakash ambedkar)

संबंधित बातम्या:

पश्चिम महाराष्ट्रातील पुरावेळी केंद्राकडून 900 कोटीही आले की नाही शंका, संभाजीराजेंचं भाजपकडे बोट

‘त्या ऊसतोड मजुरांच्या नेत्या नाहीत’, पंकजा मुंडेंना संघर्ष समितीकडून घरचा आहेर

(bjp leader pankaja munde criticized prakash ambedkar)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *