Video: आणि पंकजा मुंडेंचा कंठ दाटला, डोळे डबडबले, नाराजीवर उत्तर देता देता बाबांची आठवण

| Updated on: Jul 09, 2021 | 2:00 PM

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना पंकजा मुंडे गहिवरल्या (Pankaja Munde Emotional) असल्याचं दिसून आलं. पंकजा मुंडे यांना यावेळी गोपीनाथ मुंडे यांची देखील आठवण झाली.

Video: आणि पंकजा मुंडेंचा कंठ दाटला, डोळे डबडबले, नाराजीवर उत्तर देता देता बाबांची आठवण
pankaja munde
Follow us on

मुंबई: नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. या चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पत्रकार परिषद घेतली. पंकजा मुंडे यांनी या चर्चेला पत्रकार परिषद घेत पूर्णविराम दिला. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना पंकजा मुंडे गहिवरल्या (Pankaja Munde Emotional) असल्याचं दिसून आलं. पंकजा मुंडे यांना यावेळी गोपीनाथ मुंडे यांची देखील आठवण झाली. (Pankaja Munde emotional during press conference with memory of Gopinath Munde)

पायाला फोड आले असातना पट्ट्या बांधून पक्षाचा प्रचार

प्रीतमताई लोकसभेला निवडून आल्या. मला वाटत मुंडे साहेब जेव्हा निवडून आले तेव्हा मी एकटीच होते, आमचा एकही आमदार नव्हता, माझ्या पायाला फोड आले होते, मी पट्ट्या बांधून पक्षाचा प्रचार केला, असं सांगत असताना पंकजा मुंडे भावूक झाल्याचं दिसून आलं. प्रीतमताई निवडणुकीला ज्या उभ्या राहिल्या त्या बापाच्या मृत्यूनंतर उभ्या राहिल्या. त्यामुळे त्या रेकॉर्डब्रेक करणार होत्या. पण आता जी निवडणूक त्या जिंकल्या त्या त्यांच्या मेरीटवर जिंकल्या. तरीही ती प्रीतमताई निवडणुकीच्या उमेदवार राहणार नाहीत, अशा चर्चा होत्या. आम्ही जे कष्ट केलेत ते पक्षासाठी केलेत. माझ्याकडे येणारी गर्दी पक्षासाठी आहे ती वेगळी आहे, असं कोणी म्हणत असेल तर मी मात्र तसं म्हणणार नाही. पक्षामध्ये जे अ‌ॅडिशन झालं त्यामुळे एक जर मत वाढलं तरी ते समाधानाची बाब आहे, असं पंकजा मुंडे हे सर्व सांगत असताना गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीनं भावूक झाल्या होत्या.

प्रीतमताई लोकांना शांत करण्यासाठी राजकारणात

मनाला काय लागत नाही, मुंडे साहेबांना शपथ घेता आली नाही. ते निवडून आले आणि 3 जूनला गेले. शपथ घेण्यापूर्वी ते गेले, त्यामुळं गमतीचा भाग म्हणजे माझ्या आईला दुसऱ्या टर्मची पेन्शन देखील मिळत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. 17 दिवसात ते गेले प्रीतमताई राजकारणात आल्या ते लोकांना शांत करण्यासाठी आल्या. मुंडे साहेबांनी मला राजकारणाचे धडे दिले, असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

पक्षाच्या भावनेचा सन्मान करणार

विधान परिषद आणि राज्य सभा निवडणुका झाल्या त्यावेळी नवनवी लोकं आली आहेत त्यामुळे पक्षाची ताकद वाढेल असं नेत्यांना वाटतं असेल तर त्या भावनेचा सन्मान करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. मी भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीला सन्मान करणारी कार्यकर्ता आहे. पक्षनिष्ठा ही माझ्या बापानं मला संस्कारात दिली आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी केंद्रात नेतृत्त्व करत होते. त्यावेळी मुंडे महाजन राज्यात नेतृत्व करत होते. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांची संस्कृती काढणं आमच्या संस्कृतीत बसत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही. चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या, असं सांगत पंकजा यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच मंत्रिपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ते योग्यच होतं, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

टीम देवेंद्र वगैरे असं आमच्याकडे नाही, मी-मी असं चालत नाही, पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला

Pankaja Munde: आम्ही नाराज नाही, चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या; नाराजींच्या अफवांना पंकजा मुंडेंकडून पुर्णविराम