BREAKING पंकजा मुंडे स्टेजवरच कोसळल्या, खासगी रुग्णालयात उपचार

सचिन पाटील

Updated on: Oct 19, 2019 | 6:33 PM

भाजप नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde faints) स्टेजवरच कोसळल्या. पंकजा मुंडे (Pankaja Munde faints) भाषण करत असताना त्या खाली कोसळल्या.

BREAKING  पंकजा मुंडे स्टेजवरच कोसळल्या, खासगी रुग्णालयात उपचार

बीड:  भाजप नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde faints) स्टेजवरच कोसळल्या. पंकजा मुंडे (Pankaja Munde faints) भाषण करत असताना त्यांना भोवळ आल्याने त्या खाली कोसळल्या. भाषणादरम्यानच ही घटना घडल्याने घटनास्थळी एकच धावाधाव झाली. परळीतील टॉवर परिसरात भाजपची सभा होती. त्यावेळी ही घटना घडली. पंकजा मुंडे खाली कोसळल्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

पंकजा मुंडे केवळ नाश्ता करुन बाहेर पडल्या होत्या. त्यांनी दिवसभर जेवण केलं नव्हतं. त्यामुळे त्यांना भोवळ आल्याचं सांगण्यात येत आहे. पंकजा मुंडे परळीसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरत होत्या. मुंबई, पुणेसह नागपूर आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. त्याचा ताण पंकजा मुंडेंच्या शरिरावर दिसून आला.

नेमकं काय झालं?

पंकजा मुंडे सकाळपासून फक्त नाश्ता करुन घरातून बाहेर पडल्या. त्यांनी पाणीही वेळेवर न प्यायल्याने त्यांना भोवळ आली असल्याची शक्यता आहे. प्रचाराचा तणाव, धावपळ आणि दौरे यामुळे शारीरिक थकवा येऊन पंकजा मुंडेंना आज हा त्रास झाला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पंकजा मुंडे स्टेजवर कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात एकच गर्दी केली. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर मुंडे समर्थकांनी पकंजा मुंडेंना साथ दिली होती. त्यामुळे परळीतील गावागावत राहणारे, तसेच मुंडे समर्थक रुग्णालयाबाहेर जमा झाले आहेत.सध्या त्यांची परिस्थिती धोक्याबाहेर आहे.

पंकजा मुंडेंचा समर्थक चितेंत आहेत, नक्की काय झालं आहे, हे कशामुळे झाले, असा प्रश्न त्यांना पडला आहे. मात्र त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

परळीत हायप्रोफाईल लढत

राज्यातील सर्वात हायप्रोफाईल लढत परळीत होत आहे. कारण, पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्यात ही लढत आहे.  धनंजय मुंडेंनी ही अस्तित्वाची लढाई असल्याचं म्हटलंय. पंकजा मुंडेंनी 2014 ला 25895 मतांनी धनंजय मुंडेंवर मात केली होती. आता धनंजय मुंडे यांनी पंकजांना हरवण्याचा चंग बांधला आहे.

परळीच्या मैदानात 2014 मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी (Beed Vidhansabha Big Fight) झालेल्या रंगतदार सामन्याची पुनरावृत्ती यंदाही घडत आहे. कारण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या चुलत भावंडांमध्ये यावेळीही लढत होत आहे. पंकजा आणि धनंजय या दोघांमध्ये नेहमीच वाक्-युद्ध रंगताना दिसतं. आता निवडणुकीच्या प्रचारात ते शिगेला पोहचताना दिसले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI