पंकजा मुंडे कुठेही जाणार नाही, ऊन-पाऊस सर्वच पक्षात असतो; ‘या’ भावाचं बहिणीसाठी मोठं विधान

| Updated on: Sep 01, 2022 | 11:52 AM

पंकजा मुंडे कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. त्या भाजपमध्येच राहणार. त्यांच्या वडिलांचं आयुष्य भाजपमध्ये गेलं. त्यांचंही गेलं आहे. त्या कुठे जाणार नाहीत. त्या भाजप सोडणार नाहीत. ऊन-पाऊस सर्वच पक्षात सुरू असतो, असंही त्यांनी सांगितलं.

पंकजा मुंडे कुठेही जाणार नाही, ऊन-पाऊस सर्वच पक्षात असतो; या भावाचं बहिणीसाठी मोठं विधान
पंकजा मुंडे कुठेही जाणार नाही, ऊन-पाऊस सर्वच पक्षात असतो; 'या' भावाचं बहिणीसाठी मोठं विधान
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे: राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं आहे. शिंदे गट आणि भाजपच्या काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथही घेतली आहे. या मंत्र्यांचं खाते वाटपही करण्यात आलं आहे. अजून दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना आणि मित्र पक्षांना स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे मित्र पक्षात नाराजी ओढवली आहे. रिपाइं नेते रामदास आठवले (ramdas athawale) यांच्यापासून ते राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर (mahadev jankar) यांनीही यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यावर भाजपने (bjp) मात्र थेट काही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता पुन्हा एकदा रासप नेते महादेव जानकर यांनी आपल्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे भाजप त्यांची मागणी पूर्ण करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच पंकजा मुंडे भाजप सोडणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

रासप नेते महादेव जानकर यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली. आम्ही एनडीएत आहोत. आम्ही एनडीए सोडलेली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रीय समाज पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवे. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना भेटून मंत्रिपदाची मागणी केली आहे. त्यामुळे आम्हाला मंत्रिपद द्यायचं की नाही हा निर्णय त्यांच्या कोर्टात आहे. मित्र पक्षाला सोबत घ्यावं की घेऊ नये हे भाजपने ठरवावं, असं महादेव जानकर म्हणाले.

पंकजा मुंडे भाजप सोडणार नाही

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना नव्या सरकारमध्ये स्थान मिळणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण त्यांना या सरकारमध्ये स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच राष्ट्रवादीने त्यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली. त्यामुळे पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार की काय अशी चर्चा सुरू होती. त्यावरही जानकर यांनी भाष्य केलं. पंकजा मुंडे कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. त्या भाजपमध्येच राहणार. त्यांच्या वडिलांचं आयुष्य भाजपमध्ये गेलं. त्यांचंही गेलं आहे. त्या कुठे जाणार नाहीत. त्या भाजप सोडणार नाहीत. ऊन-पाऊस सर्वच पक्षात सुरू असतो, असंही त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

शिंदे-फडणवीसांच्या कामांचं कौतुक

यावेळी जानकर यांनी शिंदे सरकारचं कौतुक केलं. शिंदे-फडणवीस सरकार विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जात आहे. राज्यात चांगली कामं होत आहेत, अशा शब्दात त्यांनी सरकारच्या कामाचं कौतुक केलं. तसेच पक्ष आणि राज्य पुढे जावे, अशी प्रार्थना बाप्पाला केल्याचंही त्यांनी सांगितलं.