पवारांना पाटील कळलेच नाहीत, चेहऱ्यावर भाव न आणता फटका लगावतात : चंद्रकांत पाटील

| Updated on: Oct 11, 2019 | 1:47 PM

चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मध्येच अडकवून ठेवलं असं शरद पवार म्हणत आहेत. मात्र पवार तुम्हाला पाटील कळलेच नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पवारांना पाटील कळलेच नाहीत, चेहऱ्यावर भाव न आणता फटका लगावतात : चंद्रकांत पाटील
Follow us on

कोल्हापूर : “पवारांना पाटील (Pawar vs Patil) कळलेच नाहीत. पाटील (Pawar vs Patil) चेहऱ्यावर कोणतेही भाव आणत नाहीत मात्र कसा फटका लगावतो हे समजत नाही, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना टोला लगावला.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवाजी पेठेतील गडकरी हॉल येथे हा मेळावा झाला.

चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मध्येच अडकवून ठेवलं असं शरद पवार म्हणत आहेत. मात्र पवार तुम्हाला पाटील कळलेच नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

ज्या मनसेला आघाडीत घेतलं नाही, त्या मनसेच्या उमेदवाराला कोथरुडमध्ये माझ्याविरोधात पाठिंबा देण्याची वेळ त्यांच्यावर आली, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

कोथरुड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात मनसेचे किशोर शिंदे मैदैनात आहेत. या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीने उमेदवार न देता मनसेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील विरुद्ध सर्वपक्षीय अशी लढत होत आहे.

संबंधित बातम्या  

मला तुम्ही कोथरुडमध्येच अडकवून ठेवलंय : चंद्रकांत पाटील   

मेधा कुलकर्णींवर अन्याय करून निवडणूक लढवतोय : चंद्रकांत पाटील 

स्पेशल रिपोर्ट | अजित पवार चंद्रकांत पाटील यांना ‘चंपा’ असं का म्हणाले?