PHOTO: ठाकरेंच्या महागर्जना मोर्चामध्ये थेट नगरसेवकाने घातले EVM मशीनचे श्राद्ध
Uddhav Thackeray Raj Thackeray Garjana Morcha: सध्या सर्वत्र ठाकरे बंधू्च्या महागर्जना मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मोर्चात एका नगरसेवकाने रस्त्यावर बसून थेट EVM मशीनचे श्राद्ध घातले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज महामोर्चा निघाला आहे. या महागर्जना मोर्चामध्ये शिवसैनिक, मनसैनिक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्त्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत. आता शरद पवार यांच्या कार्यकत्यांनी थेट EVM मशीनचे श्राद्ध घातल्याचे दिसत आहे.
पितृपक्ष सुरु असल्यामुळे कार्यकर्त्यांनी EVM मशीनचे श्राद्ध घातले आहे. हे श्राद्ध घातलण्यासाठी अनेक कार्यकर्त्ये थेट रस्त्यावर बसले आहेत. त्यांनी श्राद्धाचे सामानही रस्त्यावर मांडले आहे आणि तेथे बसून श्राद्धाला सुरुवात केली आहे.
EVM मशीनचे श्राद्ध करण्यासाठी पदाधिकारी मिलिंद कांबळे रस्त्यावर बसले आहेत. आज या EVM मशीनमुळे RSS आणि भाजप सरकारने ज्या पद्धतीने भ्रष्टाचार करुन त्यांनी 3 वेळा सरकार आणलं असे मिलिंद कांबळे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, त्यांनी तीन वेळा महाराष्ट्राला आणि या भारत देशाला जे फसवण्याचे काम केले आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे श्राद्ध घातले आहे.
अजित रावराणे हे नगरसेवक आहेत आणि त्यांनीही या मोर्चामध्ये EVMचे श्राद्ध घातले आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले की, मी जरी निवडून आलो असलो तरी या देशामध्ये अनेक लोकांची मागणी आहे की हे ईव्हीएम हटवावे. अनेक लोकांची मागणी आहे की SIRच्या माध्यमातून झालेला जो घोळ आहे हा घोळ या देशातून हद्द पार झाला पाहिजे असे ते म्हणाले.