
पुणे : महाराष्ट्रातील राजकीय नाट्यानंतर आता (Municipal Elections) महापालिका आणि नगरपरिषद निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. त्यामुळे सर्वकाही अलबेल असे नाही तर दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपामध्येच खरी लढत होणार असल्याचे चित्र गत महिन्यापर्यंत होते पण शिंदे गटाने राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणल्याने सर्व चित्रच बदलले आहे. त्याचा परिणाम आता महापालिका निवडणुकांवरही निश्चित मानला जात आहे. (Pimpari-Chinchwad Corporation) पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणुकही काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्याअनुशंगाने सर्वतोपरी तयारी झाली असून मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडतही जाहीर झाली आहे. वॉर्डातील लोकसंख्या आणि हद्द ही देखील (Election Commission) निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार ठरविण्यात आले आहेत. प्रभाग क्र. 10 मध्ये गत निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व राहिले होते. आता 2022 मध्ये वार्ड फेररचना झाली असून यामधील काही वार्ड हे दुसऱ्या मतदारसंघात जाण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे यंदा मोरवाडी, शाहूनगर आणि संभाजीनगर अशा असलेल्या या 10 नंबर प्रभागात भाजपा वर्चस्व ठेवणार की राष्ट्रवादी कमबॅक करणार हे पहावे लागणार आहे.
लोकसंख्येनुसारच प्रभागातील वार्ड हे ठरवले जातात. निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार, 2021 मध्ये जनगणना झाली नसल्याने पूर्वीच्या लोकसंख्येत 10 टक्के वाढ झाल्याचे गृहित धरण्यात आले आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रभाग क्रमांक 10 मध्ये एकूण मतदारांची संख्या ही 39 हजार 802 एवढी आहे. यामध्ये अनुसुचित जाताचे मतदार हे 2 हजार 796 एवढे आहेत तर अनुसुचित जमातीचे 784 एवढे आहेत. उर्वरित मतदार हे सर्वसाधारण असल्याने या प्रभागातील राजकीय समीकरणे ही सर्वसाधारण वर्गातील मतदारवच अवलंबून असतात.
2017 च्या निवडणुकीमध्ये या प्रभागात 4 वार्ड झाले होते. यामध्ये मोरवाडी, शाहूनगर आणि संभाजी नगराचा समावेश करण्यात आला होता. तर 2022 च्या महापालिका निवडणुकीसाठी इंद्रायणीनगर, लांडेवाडी, महाराष्ट्र कॉलनी, शांतीनगर, गव्हाणे वस्तीचा सहभाग राहणार आहे. निवडणुसाठी नव्याने वार्डाची फेररचना केल्याने हा बदल झाला आहे. त्यामुळे उमेदवाराला देखील वार्ड आणि प्रभागाचा अभ्यास करुनच मैदानात उतरावे लागणार आहे. प्रभाग क्र. 10 मध्ये चार वार्डाचा समावेश होतो तर यंदा मात्र तीनच वार्ड राहणार आहेत. नव्याने केलेल्या प्रभाग रचनेमुळे यामध्ये काहीप्रमाणात बदल हा होऊ शकतो.
2017 साली पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादीला धक्का देत भाजपाने वर्चस्व निर्माण केले होते. या प्रभागातील 4 वार्डापैकी तीन वार्डामध्ये भाजपाचे उमेदवार हे विजयी झाले होते. अ वार्डामध्ये भाजपाच्या अनुराधा गोरखे, ब मध्ये भाजपचेच केशव घोळवे, क वार्डात मात्र राष्ट्रवादीच्या मंगला कदम यांना विजय खेचून आणता आला होता. ड मध्ये भाजपाचे तुषार हिंगे हेच विजयी झाले होते. आता मात्र निवडणुकीचे आणि प्रभागाचे देखील असेच चित्र राहणार नाही. कारण 2022 च्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेत बदल करण्यात आला आहे. या प्रभागात यंदा तीनच वार्ड राहणार आहेत.
2022 च्या मनपा निवडणुकीच्या अनुशंगाने आरक्षण सोडत पार पडली आहे. यामध्ये तीन वार्ड असून अ साठी सर्वसाधारण महिला, ब वार्डासाठी सर्वसाधारण तर क साठीही सर्वसाधारण असे आरक्षण राहणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग 10 वॉर्ड अ
| पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
|---|---|---|
| भाजपा | ||
| राष्ट्रवादी | ||
| शिवसेना | ||
| कॉंग्रेस | ||
| मनसे | ||
| इतर |
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग 10 वॉर्ड ब
| पक्ष | उमेदवार | विजयी / आघाडी |
|---|---|---|
| भाजपा | ||
| राष्ट्रवादी कॉंग्रेस | ||
| कॉंग्रेस | ||
| शिवसेना | ||
| मनसे | ||
| इतर |
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग 10 वॉर्ड क
| पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
|---|---|---|
| भाजपा | ||
| राष्ट्रवादी कॉंग्रेस | ||
| शिवसेना | ||
| कॉंग्रेस | ||
| मनसे | ||
| इतर |