
पुणे : राज्यातील राजकीय नाट्यानंतर आता (Local self-government) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. निवडणुक आयोगाने नगरपरिषदेच्या निवडणुक कार्यक्रम तर जाहीर केला आहेच पण ( Municipal Corporation Elections) महापालिका निवडणुका देखील आता येऊन ठेपल्या आहेत. 2017 च्या निडणुकीत नेहरु नगरातील खराळवाडी प्रभागात (NCP) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. पण त्यानंतर आता राजकीय स्थितीमध्ये मोठा बदल झाला असून यंदा काय होणार याकडे लक्ष लागले आहे. या प्रभागातील चारही वार्डामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते. यामध्ये गीता मंचरकर, राहुल भोसले, वैशाली घोडेकर, समीर मासुळक यांचा सहभाग होता. तर त्यापाठोपाठ मतदारांनी भाजपाच्या उमेदवाराला पसंती दिली होती.
प्रभाग क्रमांक 9 मध्ये एकूण चार वार्ड होते. तर यावेळी प्रभाग रचनेत बदल झाल्याने पूर्वीप्रमाणेच प्रभाग आणि वार्ड असे चित्र राहणार नाही. 2017 निडणुकीत चार वार्डामध्ये मासूळकर कॉलनी, नेहरुनगर, खराळवाडी, गांधीनगर या भागांचा समावेश होता. या भागातून मतदारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पसंती दिली होती. त्यामुळे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, 2021 मध्ये जनगणना झाली नसल्याने पूर्वीच्या लोकसंख्येत 10 टक्के लोकसंख्या वाढल्याचे गृहित धरण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 9 मध्ये एकूण लोकसंख्या 40 हजार 18 एवढी होती तर यामध्ये अनुसूचित जातीचे 3 हजार 489 एवढे मतदार होते. अनुसूचित जमातीचे 1 हजार 135 असे मतदार होते. तर उर्वरीत मतदार हे सर्वसाधरण होते. त्यामुळे या प्रभागात सर्वसाधरण मतदार हाच टर्निंग पॉंईंट राहिलेला आहे.
प्रभाग क्रमांक 9 मधील चारही वार्डामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. चारही वार्डात एक शिक्क्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदारांनी पसंती दिलेली आहे. त्यामुळे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात आहे. मात्र, यंदा प्रभाग रचनेत बदल करण्यात आला असून या प्रभागात हेच वार्ड राहतील असे नाही.2017 च्या निवडणुकीमध्ये गीता मंचरकर, राहुल भोसले,वैशाली घोडेकर, समीर मासुळक हे सर्व उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच उमेदवार विजयी झाले होते. गतवेळच्या निवडणुकीत
मासूळकर कॉलनी, नेहरुनगर, खराळवाडी, गांधीनगर हा भाग होता. आता या वार्डामध्ये फेरचना झाली आहे. त्यामुळे या प्रभागतले काही विभाग दुसऱ्या मतदारसंघात जाऊ शकतात. हा पूर्वीचा मतदारसंघ राहिलेला नाही.
निवडणुक विभागाने यंदा वार्डरचनेत बदल केला आहे. त्यानुसार यंदा प्रभाग क्र. 9 मध्ये तीन वार्ड राहणार आहेत. 9 अ हे सर्वसाधरण महिलेसाठी तर इतर दोन वार्ड हे सर्वसाधारणसाठी राहणार आहेत. वार्डरचनेत बदल झाल्याने राजकीय समीकरणे देखील बदलणार आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग 9 वॉर्ड अ
| पक्ष | उमेदवराचे नाव | विजयी/ आघाडी |
|---|---|---|
| राष्ट्रवादी काँग्रेस | ||
| भाजप | ||
| काँग्रेस | ||
| शिवसेना | ||
| मनसे | ||
| इतर अपक्ष |
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग 9 वॉर्ड ब
| पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी/ आघाडी |
|---|---|---|
| राष्ट्रवादी कॉंग्रेस | ||
| भाजपा | ||
| कॉंग्रेस | ||
| शिवसेना | ||
| मनसे | ||
| इतर |
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग 9 वॉर्ड क
| पक्ष | उमेदवारी | विजयी/ आघाडी |
|---|---|---|
| राष्ट्रवादी कॉंग्रेस | ||
| भाजपा | ||
| कॉंग्रेस | ||
| शिवसेना | ||
| मनसे | ||
| इतर |