विचारधारेशी तडजोड न करणाऱ्या बाळासाहेबांना अभिवादन, अमित शाहांचं ट्विट

| Updated on: Jan 23, 2020 | 4:23 PM

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे (HM Amit Shah tribute Balasaheb Thackerey).

विचारधारेशी तडजोड न करणाऱ्या बाळासाहेबांना अभिवादन, अमित शाहांचं ट्विट
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे (HM Amit Shah tribute Balasaheb Thackerey). बाळासाहेब ठाकरे नेहमीच आपल्या भूमिकांवर ठाम राहिले. त्यांनी आपल्या विचारधारेशी कधीही तडजोड केली नाही, असंही अमित शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं. पंतप्रधान मोदींसह भाजपच्या इतर अनेक नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं (BJP leaders tribute Balasaheb Thackeray).

अमित शाह म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या काळातील एक बुद्धीमान नेते होते. त्यांनी नेहमीच आपल्या वक्तृत्व कौशल्यांनं जनतेला मंत्रमुग्ध केलं. ते ता आपल्या भूमिकांवर ठाम राहिले. त्यांनी त्यांच्या विचारधारेशी, आदर्शांशी कधीही तडजोड केली नाही. बाळासाहेबांचं जीवन आणि त्यांची मूल्ये आपल्याला कायम प्रेरणा देत राहतील.”


विशेष म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपची साथ सोडत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकासआघाडीचा नवा प्रयोग केला. त्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांना धाडसी आणि दुर्दम्य म्हणत त्यांनी नेहमीच जनतेच्या कल्याणाचे मुद्दे उपस्थित केल्याचं म्हटलं. पंतप्रधान मोदी म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. धाडसी आणि दुर्दम्य बाळासाहेबांनी नेहमीच जनतेच्या कल्याणाचे मुद्दे मांडले. भारतीय नैतिकता आणि मुल्यांविषयी त्यांनी नेहमीच अभिमान वाटत राहिला. ते नेहमीच लाखो लोकांना प्रोत्साहित करत राहतील.”


राजनाथ सिंह म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे अशा नेत्यांपैकी होते ज्यांची जनतेत ओळख त्यांच्या पदामुळे नाही तर त्यांच्या उंचीमुळे होती. त्यांच्या निर्भिडपणाचे आणि स्पष्टवक्तेपणाचे लोक चाहते होते. जनतेच्या मुद्द्यांची त्यांना खूप समज होती. हे मुद्दे ते नेहमीच मांडत राहिले. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन.”

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बाळासाहेबांना ट्विटरवरुन मानवंदना.


‘कठोर अन् प्रेमळ… प्रेरणादायी अन् उर्जावान… हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सदैव मार्गदर्शन करीत राहतील…’ असं ट्वीट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ‘महाराष्ट्राचं वैभव, ज्वलंत विचारांचा ‘मार्मिक’ ठेवा, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन…!’ असं दुसरं ट्वीटही पाठोपाठ फडणवीसांनी केलं आहे.


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं ट्वीट

व्हिडीओ: