‘थापा’वरुनही राजकारण, शिंदे गटाने राजकारणाची खालची पातळी गाठली, शिवसेनेचे गंभीर आरोप

| Updated on: Sep 27, 2022 | 2:26 PM

शिंदे गटाकडून खालच्या स्थराचे राजकारण सुरु झाले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मतभेद वाढत असतानाच शिवसेनेने खळबळजनक व्यक्तव्य केले आहे. नेमके सरकार स्थापन होत असताना काय झाले हे माहित असल्याचे चिंतामणी कारखानीस यांनी सांगितले होते.

थापावरुनही राजकारण, शिंदे गटाने राजकारणाची खालची पातळी गाठली, शिवसेनेचे गंभीर आरोप
बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय राहिलेले थापा हे शिंदे गटात गेले आहेत. त्यावरुन राजकारण पेटले आहे.
Follow us on

गणेश थोरात टूीव्ही 9 मराठी प्रतिनिधी ठाणे : शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामधील आरोप-प्रत्यारोप हे सुरुच आहेत. दिवसागणीस नवा विषय समोर येत असून त्यामधून हे राजकारण (Politics) पेटत आहे. आता निमित्त आहेत ते चापसिंग थापा (Chapsing Thapa)  यांचे. कधी काळी हाच थापा बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे त्यांच्या सावलीप्रमाणे उभा असायचा. आता त्यानेच शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावरुन शिंदे गटाचे राजकारण किती खालच्या स्थराला गेले आहे हेच शिवसेनेचे प्रवक्ते चिंतामणी कारखानीस (Chintamani Karkhanis) यांनी पटवून दिले आहे. टेभी नाका येथे देवीच्या आगमनाच्या वेळी नेमके काय झाले ? हे सांगण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

बाळासाहेब ठाकरे यांचा सेवक म्हणून थापा बरीच वर्ष मातोश्रीवर आणि इतरत्र राहिलेला आहे. मात्र, तो देखील आमच्या हे दाखवून देण्याचा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळेच टेभी नाका येथील देवी आगमनाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा ड्रामा घडवून आणल्याचे कारखानीस यांनी सांगितले आहे.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेच्या जवळच्या नेत्यांना आपल्या गटात घेण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे चिंतामणी कारखानीस यांनी शिंदे गटावर बोचरी टीका केली आहे. थापा गेला, मातोश्रीवर अजून काही लोक आहेत जे कुत्रे देखील पाळतात त्यांना देखील तुमच्या गटात प्रवेश द्या असे आवाहनच कारखानीस यांनी केले आहे.

मुख्यमंत्री यांच्या कृत्याला आता शिवसेनेकडून सडेतोड उत्तर दिले जात आहे. सत्ता स्थापनेच्या वेळेस नेमके काय झाले हे सर्व आता शिवसेनेसमोर आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाकडून जे प्रयत्न केले जात आहेत ते लज्जास्पद असल्याचे कारखानीस यांनी सांगितले. शिवाय सत्ता स्थापन होताना नेमके काय झाले हे देखील शिवसेनेकडे असल्याचे ते म्हणाले आहेत.

केवळ फोडा आणि जोडा एवढेच मुख्यमंत्र्यांचे काम नाहीतर राज्याीतल शेतकरी अडचणीत आहे. शिवाय लम्पीचा प्रादुर्भाव हा वाढतच जात आहे. तर दुसरीकडे वेदांतासारखे प्रोजेक्ट इतर राज्यांमध्ये का जात आहेत असा सवाल आता शिवसेनेकडून उपस्थित करण्यात येत आहे.

धार्मिक सणोत्सवाला देखील आता राजकीय स्वरुप प्राप्त होत आहे. यापूर्वी गणेश उत्सव आणि आता नवरात्र या सणाला देखील राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न तर दूरच पण पक्षाचा आणि स्वत: चाच अजेंडा पूर्ण केला जात आहे.