‘तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है’; संजय राऊतांच्या घराबाहेर नगरसेविकेची पोस्टरबाजी

| Updated on: Jun 22, 2022 | 11:20 AM

संजय राऊत यांच्या घराबाहेर पोस्टर लावण्यात आले आहे. यो पोस्टरवर ''तेरा घमंड तो 4 दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है, जय महाराष्ट्र'' असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है; संजय राऊतांच्या घराबाहेर नगरसेविकेची पोस्टरबाजी
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (shivsena)बंडखोरी केली आहे. तसेच त्यांनी आपल्याकडे 40 आमदारांचा पाठिंबा सल्याचे देखील सांगितले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडोखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार संकटात सापडले आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्षांसमोर आता बहूूमत सिद्ध करण्याचे मोठे आव्हान आहे. बहुमत सिद्ध न झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे अजूनही शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. एकनाथ शिंदे माझे जीवाभावाचे मित्र आहेत. आज सकाळी तासभर एकनाथ शिंदेंशी बोलणं झालंय. सगळे शिवसेनेतच राहणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान हा सर्व  प्रकार सुरू असताना आता एक पोस्टर देखील चांगलेच चर्चेत आले आहे. हे पोस्टर  नगरसेविका दिपमाला बढे यांनी संजय राऊतांच्या घराबाहेर लावले आहे. या पोस्टरमध्ये ”तेरा घमंड तो 4 दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है, जय महाराष्ट्र” असा मजकूर लिहीण्यात आला आहे.

पोस्टर बनले चर्चेचा विषय

नगरसेविका दिपमाला बढे यांनी हे पोस्टर संजय राऊत यांच्या घराबाहेर लावले आहे. सध्या राज्यात मोठी उलथापालथ होण्याची संकेत मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडंखोरी केली आहे. मुख्यमंत्र्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. राज्यात अशी सर्व स्थिती असताना संजय राऊत यांच्या घराबाहेर हे पोस्टर लावण्यात आल्याने हे बॅनर चर्चेचा विषय बनले आहे. या पोस्टवर ”तेरा घमंड तो 4 दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है, जय महाराष्ट्र” असा मजकूर लिहित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले संजय राऊत?

दरम्यान थोड्याच वेळापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमधून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे हे माझे चांगले मित्र आहेत. आज सकाळीच त्यांच्याशी तासभर बोलंण झालं. त्यांच्यावर कोणीही नाराज नाही. सगळे आपलेच आहेत. ते पुन्हा इकडेच येणार आहेत. काही गोष्टी उगाचच वाढवून, फुगवून समोर दाखवल्या जात आहेत. मात्र तसं काहीही नाही असे देखील यावेळी संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.