इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाला माझा विरोध, पैसे वाडियाला द्या : प्रकाश आंबेडकर

| Updated on: Jan 18, 2020 | 6:16 PM

"इंदूमिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जो निधी देण्यात येणार आहे, तो निधी वाडिया रुग्णालयासाठी द्यावा," असे प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar on wadia hospital) म्हणाले.

इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाला माझा विरोध, पैसे वाडियाला द्या : प्रकाश आंबेडकर
Follow us on

पुणे : मुंबई महानगरपालिकेने वाडिया रुग्णालयाचे 98 कोटी रुपयांचे अनुदान थकवल्याने हे रुग्णालय बंद होण्याच्या वाटेवर (prakash ambedkar on wadia hospital) आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. “इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जो निधी देण्यात येणार आहे, तो निधी वाडिया रुग्णालयासाठी द्यावा,” असे प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar on wadia hospital) म्हणाले.

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

“कोर्टाने जे म्हटलं आहे की पुतळ्याच्या उंचीसाठी तुमच्याकडे पैसे आहेत. माझी कोर्टाला नम्र विनंती आहे, इंदू मिलच्या जागेत बाबासाहेबांचा पुतळा उभारण्याबाबत वाद आहे, माझाही त्याला विरोध आहे. ती इंदू मिलची जागा ही intellactual cause साठी वापरली गेली पाहिजे. डर्बनमध्ये भारताला एक वन मॅन आर्मी म्हणून मी ज्यावेळी हरवलं होतं, सामाजिक विषयांवर. त्यावेळी वाजपेयींनी हे कसं शक्य झालं हे सांगितलं.

मी म्हणालो, तुमच्याकडे पर्यायी स्कूल ऑफ थॉट नाही. त्यामुळे भारत सरकार हे प्रेडिक्टेबल आहे. त्यामुळे त्यांना डिफीट करणं सोपं आहे. हे थांबवण्यासाठी पर्यायी विचाराचे स्कूल ऑफ थॉट हवेत.

अटलबिहारी वाजपेयी हे अनेकदा चैत्यभूमीला येऊन गेले आहेत. त्यामुळे त्यांनी ती जागा माहित आहे. म्हणूनच त्यांनी ती जागा इंटरनॅशनल स्कूल ऑफ स्टडीजसाठी त्यांनी दिली होती. मात्र या ठिकाणच्या राजकारण्यांनी ही जागा पुतळ्यासाठी वापरली आहे. त्यामुळे हायकोर्टाला विनंती आहे की जो निधी पुतळ्यासाठी किंवा सुशोभीकरणासाठी दिला असेल हा निधी वाडिया हॉस्पिटलसाठी वर्ग केला आहे असे आदेश त्यांनी काढावे, अशी माझी विनंती आहे.”

तसेच येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु करण्याला परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाचे प्रकाश आंबेडकरांनी स्वागत केले.

मी तो पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा निर्णय म्हणणार नाही. त्यापूर्वीही आम्ही अनेकदा नाईट लाईफ बघितल्या आहेत. जगलो आहे. त्यांच्याच सरकारने हे सर्व बंद केलं होतं. आता त्यांचा नातू म्हणतो की, ते चालू करावं. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ते चालू करावं, अशी माझी विनंती आहे. मी त्याचे पूर्णपणे समर्थन करतो. कारण एका वर्गाला जो डे टाईम सर्व्हिस करतो त्याला सोशल लाईफच नाही. त्यामुळे त्याच्या वेळेप्रमाणे त्याची सोशल लाईफ झाली पाहिजे असेही प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar on wadia hospital) म्हणाले.