वीजबिले जबरदस्तीने वसूल करणारी ठाकरे सरकारची ही जुलमी राजवट; प्रवीण दरेकरांचा सरकारवर घणाघात

| Updated on: Nov 20, 2020 | 10:34 PM

राज्य सरकारने 100 युनिट वीज मोफत देण्याच्या आश्वासनावरून यू टर्न मारला आहे. उलट ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम उर्जामंत्र्यांनी केले आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

वीजबिले जबरदस्तीने वसूल करणारी ठाकरे सरकारची ही जुलमी राजवट; प्रवीण दरेकरांचा सरकारवर घणाघात
Follow us on

सोलापूर : “राज्य सरकारने 100 युनिट वीज मोफत देण्याच्या आश्वासनावरून यूटर्न मारला आहे. उलट ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम उर्जामंत्र्यांनी केले आहे. ग्राहकांना वीजबिलात सवलत नाही. वीजबिले जबरदस्तीने वसूल करण्याची ही ठाकरे सरकारची जुलमी राजवट आहे,” अशी घणाघाती टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. ते सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. (Pravin Darekar criticizes thackeray government on electricity bill)

“या सरकारमध्ये समन्वय नाही. सरकारकडून टोलवाटोलवीचे काम सुरु आहे. वीज बिलाचा निर्णय तातडीने होऊ शकतो. मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री आणि अर्थमंत्री हे तिघे एकत्र बसून निर्णय घेऊ शकतात, पण या सरकारमध्ये इच्छाशक्तीचाच अभाव आहे. हे सरकार बेफिकीर आहे. यांना जनतेच्या प्रश्नांचे काही घेणे देणे नाही,” अशी टीका दरेकर यांनी केली. तसेच, शिवसेना आणि राष्ट्रवादी वीजबिलाबाबत निर्णय न घेऊन काँग्रेसला मुद्दाम जनतेच्या नजरेत पाडण्याचे काम करत आहे. पण दुर्दैवाने काँग्रेसला स्वाभिमान नाही, असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला.

“वाढीव वीजबिलांसदर्भात भाजपची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. येत्या सोमवारी राज्य सरकारच्या वाढीव वीजबिलाच्या निषेधार्थ ‘वीजबिल होळी’चे आंदोलन भाजप करणार आहे.” असे दरेकर म्हणाले. तसेच, ग्राहकांच्या प्रश्नांची जराही काळजी असेल तर वाढीव वीजबिलासाठी सरकारने तत्काळ 5 हजार कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. (Pravin Darekar criticizes thackeray government on electricity bill)

पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात भाजपच जिंकणार

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भापजचे उमेदवार संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ दरेकर सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यानी दोन्हा जागांवर भाजपचाच उमेदवार जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. “ठाकरे सरकारला वर्ष पूर्ण होत आलं तरी अजूनही कुठल्याही प्रकारे जनतेला दिलासा मिळाला नाही. ना शेतकऱ्यांना मदत, ना बेरोजगारांना रोजगार, ना कर्मचाऱ्यांना पगार, ना अतिवृष्टीमुळे खचलेल्या शेतकऱ्याला मदत. आता वाढीव वीजबिलाच्या विषयामुळे जनतेमध्ये नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या परिस्थितीत भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार हे निवडून येतील, असं दरेकर म्हणाले. (Pravin Darekar criticizes thackeray government on electricity bill)

संबंधित बामत्या :

कृषी पंपधारकांचे 15 हजार कोटींचे वीजबिल माफ करणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

वीजबिल माफीवरुन काँग्रेसने ठाकरे सरकारला शॅाक द्यावा; आशिष देशमुखांचा घरचा आहेर

वीजबिल माफीसाठी भाजपचे सोमवारी वीजबिल होळी आंदोलन