AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीजबिल माफीवरुन काँग्रेसने ठाकरे सरकारला शॅाक द्यावा; आशिष देशमुखांचा घरचा आहेर

वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने जनतेसोबत राहावं. ठाकरे सरकारवर दबाव आणून या सरकारला शॉक द्यावा, अशी प्रतिक्रिया आशिष देशमुख यांनी व्यक्त केली आहे. (ashish deshmukh slams thackeray government over power bill issue)

वीजबिल माफीवरुन काँग्रेसने ठाकरे सरकारला शॅाक द्यावा; आशिष देशमुखांचा घरचा आहेर
| Updated on: Nov 20, 2020 | 2:38 PM
Share

नागपूर: वीजबिलाच्या माफीवरून काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने जनतेसोबत राहावं. ठाकरे सरकारवर दबाव आणून या सरकारला शॉक द्यावा, अशी प्रतिक्रिया आशिष देशमुख यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे वीजबिलाच्या मुद्द्यावरून काँग्रसे आणि राज्य सरकार आमने-सामने उभे ठाकण्याची चिन्हे दिसत आहेत. (ashish deshmukh slams thackeray government over power bill issue)

आशिष देशमुख ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. वीजबिल माफीवर ठाकरे सरकारचं घूमजाव म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे या मुद्द्यावर काँग्रेसने महाविकास आघाडीला शॉक दिलाच पाहिजे. वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून जनतेत रोष आहे. राज्यातील पाच कोटी ग्राहकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. त्यामुळे काँग्रेसने जनतेसोबत राहावं. हे सरकार काँग्रेस आमदारांच्या भरवशावर आहे. त्यामुळे वीजबिल माफीसाठी काँग्रेसने या सरकारवर दबाव निर्माण करावा, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

राजीनामे खिशात ठेवा

फडणवीस सरकारमध्ये असताना शिवसेनेच्या मंत्र्यांनी खिशामध्ये राजीनामे ठेवले होते. काँग्रेसनेही तेच करावं. जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी खिशात राजीनामे ठेवावेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, वीजबिलाच्या मुद्द्यावरून राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि मनसेने राज्यातील नागरिकांना वीजबिल न भरण्याचे आवाहन केलं आहे. मनसेने तर काल पत्रकार परिषद घेऊन सोमवारपर्यंत वीजबिल माफी न झाल्यास राज्यात मंगळवारपासून उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर, भाजपने आजपासूनच वीजबिल माफीवरून आंदोलन सुरू केलं आहे. भाजपच्या महिला आघाडीने वांद्रे येथील ‘प्रकाशगडा’वर आज मोर्चा काढला. यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ आणि आमदार अतुल भातखळकर उपस्थित होते. पोलिसांनी हा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केल्याने मोर्चेकरी महिलाही आक्रमक झाल्या होत्या. त्यामुळे येत्या काळात वीजबिल माफीचं आंदोलन राज्यात पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

संबंधित बातम्या:

‘महावितरणचे 67 हजार कोटी रुपये भाजप सरकारच्या काळातच थकीत’, जयंत पाटलांचा भाजपवर पलटवार

आमच्या सरकारच्या काळात फायद्यात असलेली महावितरण कंपनी 11 महिन्यात तोट्यात कशी?, चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

फडणवीसांना उठाबशा काढू द्या, आम्ही चितपट करु, जयंत पाटलांनी दंड थोपटले

(ashish deshmukh slams thackeray government over power bill issue)

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप